Headlines

जळगाव येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आमरण उपोषण स्थगित करण्यात आले… कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ज्यूस देवून उपोषण कर्त्याणी उपोषण सोडले

जळगाव:-आदिवासी कोळी महादेव, टोकरे कोळी , मल्हार कोळी या अनुसूचित जमातीच्या जळगाव येथील समाज बांधवांनी गेली 26 दिवस अन्नत्याग आमरण उपोषण प्रारंभ करण्यात  आले होते.त्याच अनुषंगाने 20 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाने , आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित गिरीष महाजन  अनिल पाटील या मान्यवरांसह…

Read More

आदिम विकास परिषदेच्या वतीने जळगाव अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा… मराठवाड्यात ही लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठवाडा अध्यक्ष रमेश पिट्टलवाड यांनी दिला..

आज आदिम विकास परिषदेच्या वतीने जळगाव येथील अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाडा अध्यक्ष रमेश पिठ्ठलवाड यांच्या नेतृतवाखाली परभणी बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ४००की.मी. चां प्रवास करून आंदोलन स्थळाला भेट दिली. मंचावरून भाषण करताना त्यांनी सांगितले की माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आदिवासी संचालक स्व. गोविंद गारे यांना लावलेल्या निकषानुसार विस्तारीत क्षेत्रातील आदिवासी कोळी…

Read More

आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना १७ तारखेला जळगाव येथे अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देणार

#वाल्या सेना महिला अध्यक्षा गीतांजली कोळी यांची ही उपोषण कर्त्याशी आज चर्चा. जळगाव – दि १५/१०/२०२३आज उपोषण चा सहावा दिवस आजच्या दिवशी वाल्या कोळी सेनेच्या वतीने गीतांजली कोळी यांनी जळगाव येथील अन्नत्याग आंदोलनाला आपले समर्थन देताना खंत व्यक्त केली की तीन  जणांची प्रकृती बिघडली आहे गेल्या सहा दिवसापासून जळगाव येथील आदिवासी टोकरे महादेव, मल्हार कोळी…

Read More

कोळी समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आदिवासी विकास मंत्री व अधिकार्‍यांच्या सोबत समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक लावून आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न सोडवावा यासाठी प्रयत्न करणार – ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन

जळगाव: (प्रतिनिधी) आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी यांना सविंधानाने दिलेले अधिकार मिळविण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेल्या चार दिवसापासून चालू असलेले विविध आदिवासी कोळी समाज संघटनांच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या स्थळी , महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांनी…

Read More

कंत्राटी भरती ही तात्पुरतीच – देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री 

कंत्राटी भरतीसंदर्भात जाणिवपूर्वक अफवा पसरविल्या जात आहेत. एक बाब स्पष्टपणे सांगतो की, नियमित आस्थापनेवरील कोणत्याही जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार नाहीत. 75 हजार पदभरतीचा निर्णय आम्ही घेतला आणि कार्यवाही सुरु केली. आता ती भरती दीड लाखांच्या घरात जात आहे. ती कायमस्वरुपी भरती प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात पदभरती करावी लागते, कारण काम थांबू…

Read More

धनगर समाज कार्यकर्त्याला सोलापूर येथे झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ निलंग्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन…

दि. 08/09/23: निलंगा :-रोजी शिवाजी चौक निलंगा येथे सोलापूर येथे सकल धनगर समाज आरक्षण संदर्भात निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ  गेले असता महसूल मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देत असताना भंडारा लावला म्हणून भाजप कार्यकरत्यांनी लाथाबूक्यानी खालीपडे पर्यत मारहाण केली. या घटनेचा सकल धनगर समाज व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध व चौकामध्ये विखे पाटलाच्या…

Read More

आदिवासी वाल्मीकलव्य सेना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सर्वांना सुलभतेने मिळावे यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये संघर्ष पदयात्रा काढणार…शाणाभाऊ सोनवणे अध्यक्ष आदिवासी वाल्मीकलव्य सेना तथा शिवसेना जिल्हा उप प्रमुख धुळे

धुळे प्रतिनिधी:-आदिवासी वाल्मीकलव्य सेनेच्या धुळे येथे झालेल्या बैठकीमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आदिवासी कोळी जमातीतील टोकरे कोळी, कोळी महादेव , मल्हार कोळी, डोंगर कोळी, इत्यादी अनुसूचित जमातींना एक दोन तालुके वगळता साऱ्या महाराष्ट्र भर जात प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही आणि वैधता प्रमाणपत्र तर पडताळणी समिती कडून सर्रास दिलेच जात नाही. गेल्या अनेक वर्षापासून याबाबत संघर्ष करीत असलेल्या…

Read More

पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार अग्रीम अनुदान व पीक विमा देऊन व निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा – अशोकराव पाटील निलंगेकर

निलंगा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतातील  पीक मागील दोन महिने पाऊस नसल्या कारणामुळे पूर्णपणे करपून जात आहे त्यामुळे सोयाबीन पिकांवर आलेल्या येलो मोझ्हाक या रोगामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागत असल्याने पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार अग्रीम अनुदान व पीक विमा देऊन व निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी तालुके हे कोरडे दुष्काळ म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना…

Read More