#वाल्या सेना महिला अध्यक्षा गीतांजली कोळी यांची ही उपोषण कर्त्याशी आज चर्चा.
जळगाव – दि १५/१०/२०२३आज उपोषण चा सहावा दिवस आजच्या दिवशी वाल्या कोळी सेनेच्या वतीने गीतांजली कोळी यांनी जळगाव येथील अन्नत्याग आंदोलनाला आपले समर्थन देताना खंत व्यक्त केली की तीन जणांची प्रकृती बिघडली आहे गेल्या सहा दिवसापासून जळगाव येथील आदिवासी टोकरे महादेव, मल्हार कोळी बांधव अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी आमरण उपोषण ला बसले आहेत.जळगाव चे आमदार गुलाबराव पाटील,मंत्री गिरीश महाजन ,अनिल पाटील, विधान परिषद चे आमदार रमेशदादा पाटील सर्वांनी आज भेट दिली. आश्वासन दिले पण परंतु समाजाला न्याय मिळण्यासाठी सहाही उपोषण कर्ते यांनी मागणी पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा निर्धार केला आआदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना १७ तारखेला जळगाव येथे अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देणार हे. याबद्दल मी या लढवय्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या धीराचे त्यागाचे कौतुक करते. आपल्या प्रयत्नाला यश आले पाहिजे यासाठी आम्ही ही प्रयत्न करू. आणि माझ्या वतीने मी आव्हान करते की समाजाला न्याय मिळण्यासाठी समाज बांधवांनी सर्वांनी मोठ्या संख्येने उपोषण स्थळी हजेरी लावा किंवा प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करून उपोषण ला समर्थन करण्याचे आवाहन जळगाव येथील उपोषण स्थळावरून समाजबांधवांना त्यांनी केले .

# आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. शरण खानापुरे आणि कार्याध्यक्ष दत्ता सूरवसे यांनी दिला अन्नत्याग आंदोलनाल पाठींबा. १७ऑक्टोबर ला उपोषण स्थळी कार्यकर्त्यांसह जाणार आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना खालील प्रमाणे आवाहन केले आहे.
🏹 *चलो जळगाव, चलो जळगाव*🏹
🔥 *उल गुलान ज्यारी था! ज्यारी है! ज्यारी रहेगा!!!*🔥
आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष तथा आदिवासी कोळी जमातीचे गाढे अभ्यासक डॉ. शरण खानापुरे साहेब ,कार्याध्यक्ष:- मा.आदि.दत्ताभाऊ सुरवसे साहेब. व जळगाव,धुळे, नंदुरबार आपल्या संघटना पदाधिकारी/सदस्य ह्यांनी दिनांक 17 ऑक्टोबर 2023 वार मंळवार,वेळ :- सकाळी 12.00 वाजता “जळगाव” येथे अन्नत्याग आमरण उपोषणकर्ते मा.आदि.जगन्नाथबापू बाविस्कर साहेब ,ह्यांना भेट देणार आहेत.तसेच सर्व अन्नत्याग आमरण उपोषणकर्ते ह्यांना आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना जाहीर पाठिंबा देत आहे. महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी महादेव/डोंगर कोळी,कोळी ढोर/टोकरे कोळी,कोळी मल्हार जमात बांधव ह्यांना आव्हान करण्यात येते.की,दिनांक 17 ऑक्टोबर 2023 वार मंगळवार रोजी जळगाव येथे सर्व आदिवासी बांधव ह्यांनी हजर राहावे.
जय आदिवासी
*आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य…*



