शिवसेना( उबाठा) कार्यकारिणीचा विस्तार- शरद कोळी यांना उपनेतेपद
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कुबाथा यांचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी पक्षाची जबाबदारी आपल्या निष्ठावंत शिलेदारावर दिलेली आहे.
खासदार विनायक राऊत ,खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब यांना शिवसेना नेतेपदी बढती मिळाली आहे. उद्धव ठाकरेंच्या गोटात महत्वाची जबाबदारी पार पाडणारे आमदार रवींद्र वायकर आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यावरही नेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचीही सेना नेतेपदी बढती करण्यात आली आहे .
या नवीन नियुक्ती मुळे सहा नेत्यांसह ठाकरे गटात एकूण सोळा नेते झाले आहेत.
विजय उर्फ बंड्या साळवी परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव कोल्हापूरचे संजय पवार मुंबईच्या माजी नगरसेविका राजुर पटेल शितल देवरुखकर आणि
धाडस या संघटनेच्या मार्फत शिवसेनेत आलेले सोलापूरचे शरद कोळी यांच्यासह नाशिकच्या शुभांगी पाटील जानवी सावंत छाया शिंदे आणि अस्मिता गायकवाड यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी स्वप्नात आली आहे संघटक पदी मुंबईचे विलास वावर विलास रुपवते आणि छत्रपती संभाजी नगरचे चेतन कांबळे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
धाडस या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या सोलापूरच्या शरद कोळी यांची उपनेते नियुक्ती केल्यामुळे कोळी समाजाला शिवसेने सारख्या राजकीय पक्षात स्थान मिळालेले आहे. शरद कोळी यांचा उपनेते पदी निवड झाल्याबद्दल कोळी समाज संघटनातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिलेले आहेत.
कोळी समाज संदेश परिवारातर्फे ही शरद कोळी यांना हार्दिक शुभेच्छा..!!


