Headlines

निलंगा बस स्थानकात डिझेल भरताना एसटीला भीषण आग; 

निलंगा बस स्थानकात डिझेल भरताना एसटीला भीषण आग; 

ऑपरेटर गंभीर भाजला

………..

निलंगा बस स्थानकात आज सायंकाळी ८ वाजता डिझेल भरत असताना एसटी बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत डिझेल भरणारे ऑपरेटर बसवराज मठपती हे गंभीररित्या भाजले असून, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने, अग्निशामक दलाने वेळेवर धाव घेतल्याने डिझेल पंपाचा मोठा स्फोट टळला आणि मोठा अनर्थ टळला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा बस स्थानकातील पंपावर एसटी बसमध्ये डिझेल भरण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक ठिणगी पडून आगीचा भडका उडाला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. डिझेल भरणारे ऑपरेटर बसवराज मठपती हे आगीच्या विळख्यात सापडल्याने गंभीर भाजले आहेत. त्यांना तात्काळ निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

नगरसेवक ईश्वर पाटील यांची तत्परता, अग्निशामक जवानांचे शौर्य…

 

घटनेची माहिती मिळताच निलंगा नगरपालिकेचे नगरसेवक ईश्वर पाटील यांनी तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. घटनास्थळी डिझेलचा मोठा साठा असल्याने आग पसरली असती तर भीषण स्फोट होण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून आगीवर नियंत्रण मिळवले आणि डिझेल टाकीपर्यंत आग पोहोचण्यापूर्वीच ती विझवली.

या भीषण आगीत एसटी बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला असून महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे समजताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून आता या आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला

जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *