Headlines

कोळी महासंघाचे अध्यक्ष, मा. आमदार रमेश दादा पाटील यांची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षा तथा मा.केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांची भेट घेऊन आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नावर चर्चा

नवी दिल्ली:राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षा तथा मा.केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती दीदी यांची नवी दिल्ली येथील त्यांच्या नवीन कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी त्यांचा सन्मान करून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या अत्यंत सकारात्मक भेटीदरम्यान, महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीच्या बांधवांच्या प्रलंबित मागण्या आणि त्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

त्यांनी याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दर्शवत, त्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या सहकार्याची भूमिका दर्शवली .

समाजाच्या हक्कासाठी आणि विकासासाठी असलेल्या या प्रयत्नांना त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

#SadhviNiranjanJyoti #नवी_दिल्ली #NewDelhi #सदिच्छा_भेट #CourtesyMeeting Sadhvi Niranjan Jyoti Koli Mahasangh Chetan Ramesh Patil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *