ठाणे: (योगेश कोळी)- दिवंगत अनंत तरे साहेबांचा धुळे कोर्टातील न्यायीक लढा जिंकला…….
अखेर धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने कोळी समाज बांधवांना १८ वर्ष चाललेल्या न्यायालयीन लढयातुन निर्दोष मुक्तता केली…
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर 10 ऑगस्ट 2009 रोजी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अनंत तरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जातीच्या दाखला सुलभतेने मिळणे जात वैधता प्रमाणपत्र मिळणे आदी मागण्यासाठी कोळी समाजाचा भव्य मोर्चा काढला होता या मोर्चाचे आयोजन कोळी समाजाचे नेते शानाभाऊ सोनवणे यांनी केले होता . त्या मोर्चाच्या प्रसंगी पोलिसांनी लाटी चार्ज व गोळीबार केला आणि त्यानंतर या संदर्भातला जो न्यायालयीन खटला होता तो 2009 पासून धुळे जिल्हा न्यायालयात १८ वर्ष प्रलंबित होता.
अनंत तरे साहेबांच्या पश्चात गेली पाच वर्ष हा न्यायालयीन लढा या मोर्चाचे आयोजक शानाभाऊ सोनवणे आणि महाराष्ट्र कोळी समाज संघाचे समन्वयक व अनंत तरे साहेबांचे स्वीय सहाय्यक योगेश कोळी हे खंबीरपणे इच्छाशक्ती घेऊन धुळे जिल्हा सत्र न्यायालयात न्यायालयीन लढा लढत होते आणि अखेर आज सत्याचाच विजय झाला .
धुळे न्यायालयाने योगेश कोळी शाना भाऊ सोनवणे आणि मोर्चातील 1३३ जणांची निर्दोष सुटका करत सरकारवर प्रचंड ताशेरे ओढले आहे आणि सांगितले की तुम्ही या सगळ्या कोळी समाज बांधवांना खोट्या गुन्ह्याखाली अटक केली होती आणि त्यामुळे सबळ कोणतेही पुरावे न मिळाल्याने सर्व समाज बांधवांची निर्दोष सुटका झाली.
कोळी समाजाच्या वतीने अंत्यत पोटतिडकीने न्यायालयात न्यायीक बाजु मांडणारे धुळ्याचे जेष्ठ विधी तज्ञ एड. राजेंद्र गुजर साहेब यांचे महाराष्ट्र कोळी समाज संघ आणि अनंत तरे कुटुंब यांचे वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद
आणि खरंच हा ऐतिहासिक निकाल मानावा लागेल कारण गेले जानेवारी महिन्यापासून पाच महिने सतत या खटल्याची जलद गतीने सुनावणी होत होती आणि समाजबांधव संपूर्ण मनस्ताप आणि आर्थिक गोष्टीची चंचणण सहन करुन केवळ आणि केवळ समाजाच्या प्रश्नासाठी आणि दिवंगत अनंत तरे साहेब तसेच या मोर्चा ज्यांनी समाजासाठी बलिदान केले ते भटुभाऊ कुवर यांना हा निकाल यांच्या स्मृतीस अर्पण करतो .
आणि समाज बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कोळी समाजाला जातीचे दाखले, जात वैधता ज्यावेळेस सुलभतेने मिळेल त्यावेळेस समाज बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की समाज बांधवांनी 18 वर्ष हा न्यायिक लढा लढल्यामुळे त्यांच्या त्यांच्या श्रेयामुळे आज आपल्याला जातीचे दाखले मिळतील त्यामुळे त्यांचे योगदान समाज बांधवांनी कधी विसरू नये.
पुन्हा एकदा धुळे केस मधुन निर्दोष मुक्तता झालेल्यां समाज बांधवांचे महाराष्ट्र कोळी समाज संघ आणि अनंत तरे कुटुंबीयांच्या वतीने संजय तरे साहेब व अनंत तरे साहेब यांच्या कन्या डॉ जस्मिन, डॉ दक्षता यांच्या कडून मनःपूर्वक अभिनंदन…. तसेच धुळे धुळे कोर्टातील प्रत्येक केसच्या तारखेला अनंत तरे साहेब आणि आमच्या बरोबर समाजासाठी उपस्थित राहणारे महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सचिव मदन भोई यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतो.
न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली पण जो पर्यंत दिवंगत अनंत तरे साहेबांचे स्वप्न आहे की कोळी समाजाला संपूर्ण न्याय मिळत नाही जातीचे दाखले जात वैधता प्रमाणपत्र तोपर्यंत हा सरकार विरोधला लढा असाच सुरू राहील .
जय वाल्मिकी जय एकविरा
धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने दिवंगत नेते अनंत तरे यांच्या सह कोळी समाज बांधवांना १८ वर्ष चाललेल्या न्यायालयीन लढयातुन निर्दोष मुक्तता


