दिनांक 29 /3/26- (सिद्धार्थ कोळी)- रोजी रविवारी महाराष्ट्र राज्यातील कोळी समाजाचे प्रदेश अध्यक्ष परेश भाई कोळी ह्यांच्या नेतृत्वखाली “ठाणे जिल्हा कोळी भवन ” मध्ये कोळी समाजाचे वधुवर मेळावा शेकडोच्या युवा युवतीच्या उपस्थित मध्ये संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख राष्ट्रीय महामंत्री डी. पी. शंखवार साहेब ह्यांच्या अध्यक्षातेखाली करण्यात आला. ह्यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष महादेव बुवा शाबाजकर, प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ भाऊ कोळी उपास्थित होते.
ह्या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील नवीन निवडून आलेले कोळी समाजाचे नगरसेवक आणि नगरसेविका ह्यांच्या सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले.
ह्यावेळी समाजाला प्रबोधन करताना सिद्धार्थ कोळी ह्यांनी मुंबई मधील कोळी समाजाने संघटनेच्या कार्यात भरपूर योगदान द्यावे. मुंबई मध्ये कोळी समाजाची लोकसंख्या भरपूर प्रमाणात आहे त्यांनी जर मुंबईतील आंदोलनात सहभाग नोंदवला तर सरकार आपला प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही.
सदर मेळाव्यात एकूण 235 वधूवर स्टेजवर उपस्तीत राहून आपल्या जीवनातील साथीदार कसा हवा ह्याची माहिती ची देवाण घेवाण झाली.
आपसात चर्चा आणि सामाजिक प्रश्न यावर चिंतन आणि मार्गदर्शन ही करण्यात आले.


