बुलढाणा : कोळी महासंघाच्या लोणावळा येथील चर्चा सत्रातील निर्धार नुसार प्रत्येक जिल्ह्यात कोळी महासंघ जनसंपर्क कार्यालय उघडण्याच्या कार्याला बुलढण्यातून सुरुवात झाली आहे.
बुलढाणा कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष श्री.राम सुरडकर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे ॲड .चेतन पाटील अध्यक्ष भाजपा मच्छीमार सेल युवा नेते कोळी महासंघ यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी श्री .राम सुरडकर यांना शुभेच्छा देत असा विश्वास व्यक्त केला कि ,त्यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या या जनसंपर्क कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या विविध अडीअडचणी, समस्या समजावून घेऊन .. त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील .
या शुभारंभ प्रसंगी विदर्भ प्रमुख श्री .पहाडसिंगजी सुरडकर, श्री . गंगाधर तायडे , सौ. माधुरीताई मारके यांच्यासह बुलढाणा जिल्ह्यातील कोळी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
yandanxvurulmus.xdEj6SCnkUWZ