Headlines

एसटी महामंडळाच्या जनजागृती उपक्रमासाठी रितेश-जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

२२ एप्रिल २०२६ : (मुंबई)-एसटी महामंडळाच्या जनजागृती उपक्रमासाठी रितेश-जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि परिवहन खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’च्या जनजागृती उपक्रमाला बळकटी देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीचा करार हस्तांतरण सोहळा मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती मोहिमांना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे, तसेच परिवहन खात्याच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’ची जनजागृती अधिक परिणामकारक करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. विशेषतः रस्ता सुरक्षा, प्रवासी जनजागृती आणि सामाजिक संदेशांच्या प्रसारासाठी या दोन्ही कलाकारांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

#Devendrafadanvis #Eknathshinde #Pratapsarnaik #RiteshGeneliadeshmukh #Msrtcbrandambassador

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *