राम मालेवाड (नांदेड)– महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना कोळी महासंगाचे मराठवाडा अध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. श्री शंकरराव मनाळकर यांनी आदिवासी कोळी जमात बांधवाना जात प्रमाण पत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रीत्या मिळावे असे निवेदन दिले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण साहेब, आदिवासी आमदार मा. केराम साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री संतुकरावजी हंबर्डे साहेब, आमदार अंतापूरकर साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते. आदिवासी कोळी जमात बांधवांतर्फे मा. शंकररावजी मनाळकर साहेब यांचे मनापासून आभार.

*निवेदनाचे मुख्य मुद्दे:*
– आदिवासी कोळी जमात बांधवाना जात प्रमाण पत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रीत्या मिळावे
– इंग्रज काळापासूनच्या व निजाम कालीन पुराव्यासह निवेदन दिले
– आदिवासी कोळी जमात बांधवांच्या समस्यांचे निराकरण व्हावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.


