मुंबईचा भूमिपुत्र संपूर्ण कोळी समाज ससून डॉक मासेमारी बंदरावर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात
१६ डिसेंबर रोजी कोळी महासंघाचे अध्यक्ष *रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली* कोळी आणि मच्छीमार समाजाच्या निरनिराळ्या संघटना ऐतिहासिक रित्या रस्त्यावर उतरनार आहेत.
“ससून डॉक हे केवल कोळी समाजाच्या अस्तित्वाचे प्रतीक नाही तर एकंदरीत मुंबईतील कोळी समाजाची आमदनी ,आवास आणि अस्तित्वाची ही लढाई आहे.आपण सगळ्यांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती .
राजहंस विठ्ठल टपके सरचिटणीस – कोळी महासंघ
🟨 कोळी महासंघाच्या एल्गार मोर्चासाठी महिला भगिनी सज्ज!
कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष श्री.चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत मच्छीमार महिला भगिनींची बैठक संपन्न.
कोळी महासंघाच्या वतीने मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कोळी मच्छीमार बांधवांच्या भव्य मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईतील मच्छीमार महिला भगिनींची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष श्री. चेतन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
यावेळी चेतन पाटील यांनी सर्व महिलांना मोर्च्याच्या नियोजनाची सखोल माहिती दिली. मच्छीमार बांधवांच्या व भगिनींच्या न्याय हक्कांसाठी लढताना शांतता, शिस्त आणि एकजुटीचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.
महिला भगिनींनी मोर्च्यात सक्रिय आणि शिस्तबद्ध सहभाग कसा घ्यावा, याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.
त्यांच्या प्रेरणेमुळे मच्छीमार महिलांमध्ये एक नवा उत्साह आणि लढण्याची प्रेरणा संचारल्याचे दिसून आले.
१६ डिसेंबरच्या एल्गार मोर्चासाठी महिला भगिनी पूर्ण ताकदीने सज्ज झाल्या आहेत.


