Headlines

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते आज मुंबईत ‘प्रोजेक्ट महादेवा’चा संयुक्तपणे शुभारंभ

फुटबॉलमध्येही जगात आपले नाव कोरण्याचा भारताचा GOAL!

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते आज मुंबईत ‘प्रोजेक्ट महादेवा’चा संयुक्तपणे शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लिओनेल मेस्सी सारख्या महान खेळाडूचे स्वागत करणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. येणाऱ्या काही वर्षात फुटबॉल मैदानावर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज असलेल्या, आमच्या 60 मुलांना ते मार्गदर्शन करत आहेत, जे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. ‘प्रोजेक्ट महादेवा’च्या माध्यमातून आपल्या राज्यात फुटबॉलला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणले जात असून, आमच्या 60 उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा दिल्याबद्दल लिओनेल मेस्सी यांचे मनःपूर्वक आभार.

Oplus_131072

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘प्रोजेक्ट महादेवा’ हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा उपक्रम आहे, जो संपूर्ण राज्यात तरुण फुटबॉल मधील प्रतिभेचा (13 वर्षांखालील) शोध घेवून फुटबॉल मधील उच्च दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती, परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाची संधी दिली जाणार आहे. तसेच हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग या विविध संस्थांच्या विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *