Headlines

कोळी महासंघाचे सरचिटणीस तथा सागर शक्ती मासिकाचे संपादक राजहंस टपके यांना सामाजिक कार्यासाठी मानद डॉक्टरेट देऊन गौरव करण्यात आला …

अभय पाटील (पनवेल) – कोळी महासंघाचे सरचिटणीस तथा सागर शक्ती मासिकाचे संपादक श्री *राजहंस टपके* …… *डॉक्टर मा.राजहंस टपके* जे कोळी समाजाच्या हक्कांसाठी आणि एकजुटीसाठी आपल्या वाणीतून आणि लेखणीतून कार्यरत आहेत; मा.राजहंस टपके साहेब स्वताच एक चळवळ आहेत. लाखो कोळी युवकांचे ते स्पुर्थीस्थान आहेत. एक मार्गदर्शक वाटाड्या म्हणून समाजासाठी त्यांनी आजवर काम केले आहे. ते विविध बैठका, आंदोलने आणि कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी असतात, ज्यात कोळीवाड्यांमधील समस्या सोडवण्यासाठी आणि समाजाला संघटित करण्यासाठी त्यांचे नेतृत्व आहे. कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आवाज उठवणे, समाज एकवटणे (मिशन एकवट), मच्छीमारांच्या समस्यांवर तोडगा काढणे, आणि बैठका व आंदोलने आयोजित करणे.कोळी समाजाला एका व्यासपीठावर आणणे, त्यांच्या मूलभूत प्रश्नांना न्याय मिळवून देणे, आणि मच्छीमार भगिनींच्या मागण्यांसाठी लढणे.मुंबईतील विविध कोळीवाड्यांमध्ये बैठका आयोजित करणे आणि “लक्ष्यवेधी” लाँग मार्च सारख्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेणे. अशा अनेक कार्यात त्यांचे बहुमुल्य योगदान आहे. राजहंस टपके हे कोळी महासंघाचे एक महत्त्वाचे सदस्य असून, ते समाजाच्या हितासाठी आणि एकजुटीसाठी सातत्याने प्रयत्नशील असतात कोळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील कामांमध्ये ते सक्रिय आहेत आणि युवा प्रदेशाध्यक्ष चेतन पाटील यांच्यासोबतही ते कार्य करतात. *राजहंस टपके यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान*

महाराष्ट्रतील कोळी-मच्छीमार, आदिवासी व तत्सम समाजामध्ये सातत्याने *जाणीव जागृती, समाजप्रबोधन आणि सामाजिक संघटन* घडवून आणणाऱ्या कार्याची दखल घेत *राजहंस विठ्ठल टपके* यांना *वर्ल्ड ह्युमन राइट्स प्रोटेक्शन कमिशन* , नवी दिल्ली यांच्या वतीने *मानद डॉक्टरेट (Doctor of Social Work)* पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथील वर्ल्ड ह्युमन राइट्स प्रोटेक्शन कमिशनच्या कार्यालयातून प्राप्त झालेल्या या सन्मानाचे वितरण *महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. गिरीश महाजन* यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले.

*सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य* केल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.

 

*तीन दशकांहून अधिक काळ समाजासाठी झटणारे नेतृत्व*

गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून कोळी-मच्छीमार समाजाच्या *एकत्रिकरणासाठी, सामाजिक उत्क्रांतीसाठी आणि सहकारी चळवळीच्या बळकटीकरणासाठी* राजहंस टपके यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

विशेषतः गेल्या *२३ वर्षांपासून ‘मासिक सागरशक्ती’चे संपादन* करत त्यांनी समाजप्रबोधन, हक्कांची जाणीव आणि विचारांची दिशा देण्याचे काम अखंडपणे सुरू ठेवले आहे.

*महिला सक्षमीकरण, आर्थिक उन्नती आणि सांस्कृतिक जडणघडण*

कोळी महिला सक्षमीकरण, मासेमारी व्यवसायासाठी *विविध आर्थिक उन्नतीच्या योजना,* सांस्कृतिक चळवळीची जडणघडण तसेच *राजकीयदृष्ट्या समाजाला जागृत करण्याचे मोठे कार्य* त्यांनी केले आहे.

या व्यापक सामाजिक योगदानाची दखल घेत *वर्ल्ड ह्युमन राइट्स प्रोटेक्शन कमिशनने* त्यांना *Doctor of Social Work* ही मानद पदवी प्रदान करून गौरविले.

कोळी महासंघ व कोळी समाज संदेश यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन…

 *कोळी समाजासाठी अभिमानाचा क्षण* 

राजहंस टपके यांना मिळालेला हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून *संपूर्ण कोळी-मच्छीमार समाजासाठी गौरवाचा आणि प्रेरणादायी क्षण* ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *