मंत्रालय, मुंबई येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन धनगर आरक्षणाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पीडित धनगर कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत समावेश करण्याबाबत निवेदन दिले.
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश व्हावा, या न्याय्य मागणीसाठी राज्यभर गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनात अनेक धनगर बांधवांनी आपल्या कुटुंबाच्या व समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. यापैकी बहुतांश बांधव हे आपल्या कुटुंबाचे प्रमुख उत्पन्न स्रोत होते. त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे संबंधित कुटुंबांवर उपजीविका, शिक्षण व भविष्यातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच या पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासन स्तरावर तातडीने विशेष निर्णय होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी कळकळीची विनंती करण्यात आली 
🔹 धनगर आरक्षण चळवळीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ₹२५ लाखांची आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी,
🔹 तसेच प्रत्येक पीडित कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय नोकरी देण्याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात यावा.
या प्रसंगी माझे सहकारी आमदार मा. श्री. बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.
धनगर समाजाच्या न्यायहक्कासाठीचा हा लढा ठामपणे आणि सातत्याने सुरूच राहील.



