Headlines

माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी गावीत परिवाराच्या वतीने नवीन संवत्सर तथा नूतन हिंदू नववर्षाच्या नागरिकांना दिल्या हार्दिक शुभेच्छा!

नंदुरबार – नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील समस्त नागरिकांना नवीन संवत्सर तथा नूतन हिंदू नववर्ष सुखाचे समृद्धीचे जावो; अशा शुभेच्छा गावीत परिवाराच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी समस्त नागरिकांना दिल्या आहेत.

आज दिनांक 19 मार्च 2026 रोजी श्री शालिवाहन शक १९४८ पराभव नाम संवत्सर कलियुग शक ५१२८ या नुतन हिंदू नव वर्षाचा प्रारंभ झाला. यानिमित्त खोडाई माता रोडवरील आपल्या निवासस्थानी विधिवत मनोभावे पूजन करून माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी पारंपारिक रित्या गुढी उभारली आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडवा साजरा केला. तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील समस्त नागरिकांच्या जीवनातील दुःख कष्ट समस्या यांचे निराकरण होवो, यासाठी प्रार्थना करीत समस्त जिल्हा वासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *