कोळी महासंघाचे संस्थापक उपाध्यक्ष, शिवसेनेतील एक जेष्ठ नेते व मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा विरोधी पक्ष नेते दलितमित्र नाटककार , अभिनेते रामकृष्ण केणी यांचे दुःखद निधन झाले आहे . आदिवासी कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र सुभतेने मिळण्याबाबत च्या प्रश्नावर करण्यात आले ल्या अनेक आंदोलनात त्यांचा सिंहाचा वाटा होता.. त्यांचे मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक पद जात पडताळणीच्या वरवंट्यात कसे गेले हे ते सांगत असत… एथेनिक ऑस्थेंटिसिटी न बघता कसलाही अभ्यास नसताना या मुंबई बेटावरील मूळ आदिवासीचे जात प्रमाणपत्र अवैध करण्यात आले. फकत त्यांच्याकडे लेखी कागद नव्हते या मुळे…
तरीही हा व्यक्ती खचला नाही सलग सात वर्षे, २०११ पासून ते २०१८ पर्यंत संपूर्ण महारष्ट्रात फिरून कोळी महासंघ ही संघटना मोठी करण्याची जबदारी घेऊन सामाजिक कार्यकेले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील नाटक बसवून त्यांनी महाराष्टभर प्रयोग लावले.. फटाकडी या मराठी सिनेमात ही त्यांनी काम केले आहे.

त्याबाबत तुर्भे नवी मुंबई येथील लोकडाता चे संपादक दिलीप काकनाटे याची बोलकी प्रतिक्रिया.
- केणी साहेब धाराविचा जूना जनता शिवसैनिक गेला धाराविच्या शाखे समोरच असलेले जुने घर त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आज ही आठवण आहे तुम्ही सावंत व सुर्यवंशी यांना नगरसेवक बनविले व शंकर बळी यांना शाखा प्रमुख केले तसेच आपण सांस्कृतिक कार्यक्रम नाचता गाता गाऊ भिम गाता हे महाराष्ट्रात अप्रतिम प्रसिद्ध झाले …. साहेब आपणास भावपूर्ण श्रद्धांजली…
- *कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते,* *साहित्यिक व नाटककार*
- *रामकृष्ण केणी यांचे दुःखद निधन* – *एक लढवय्या आवाज हरपला*
मुंबईतील मूलभूमिपुत्र कोळी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे, साहित्य, नाटक आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारे ज्येष्ठ नेते *रामकृष्ण केणी यांचे रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन* झाले. मागील काही दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. मृत्यूसमयी ते ८६ वर्षांचे होते.
रामकृष्ण केणी हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर ते विचारवंत, साहित्यिक आणि समाजाच्या वेदनांना शब्द देणारे प्रभावी नाटककार होते. *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित “युगपुरुष” हे नाटक रंगमंचावर आणून त्यांनी दलित, वंचित आणि कोळी समाजाला सांस्कृतिक व्यासपीठावर आवाज दिला.* अन्यायाविरुद्ध उभे राहणे, शोषितांच्या बाजूने निर्भीडपणे बोलणे हीच त्यांची ओळख होती.
मुंबईतील धारावी विभागातून ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. *बृहन्मुंबई महानगरपालिकेत त्यांनी सभागृह नेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली.* मुंबईत शिवसेना संघटनात्मकदृष्ट्या बळकट होण्यात त्यांचे मोठे योगदान होते. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातील आणि बिंदा ठाकरे यांचे जिवलग मित्र म्हणून ओळखले जात.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाज एकत्र यावा, संघटित व्हावा आणि आपल्या हक्कांसाठी लढावा यासाठी त्यांनी असंख्य आंदोलने, मोर्चे आणि संघर्ष उभे केले. २००८ साली शिवाजी पार्क येथे झालेल्या कोळी समाजाच्या भव्य मेळाव्याचे ते प्रमुख मार्गदर्शक होते. महाराष्ट्रातील विविध समाज संघटनांची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाचे ते संस्थापकीय नेते होते, ही बाब कोळी समाजासाठी अभिमानाची आहे.
त्यांच्या निधनाने *मुंबईतील भूमिपुत्रांचा एक खंबीर, निर्भीड आणि प्रामाणिक आवाज हरपला* आहे. ही हानी कोळी समाजापुरती मर्यादित नसून, सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक घटकासाठी अपूरणीय आहे.
कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी तीव्र शोक व्यक्त करताना म्हटले आहे की,
*“रामकृष्ण केणी यांचे जीवन म्हणजे संघर्ष, निष्ठा आणि समाजासाठी झटण्याचा जिवंत इतिहास* होता. त्यांच्या जाण्याने मुंबईतील भूमिपुत्रांचा आवाज शांत झाला आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढ्यांनी पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना व कोळी समाजाला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना.
समस्त कोळी बांधव व महाराष्ट्र मच्छिमार सेना पदाधिकारी, सहकारी – मंगेश कोळी यांचे मनोगत
कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य आणि कोळी समाज संदेश परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो… ओम शांती: शांती: 🙏
शोकाकुल- मा आमदार रमेशदादा पाटील , प्रकाश बोबडी, राजहंस टपके, #ॲड_चेतन_पाटील #सतिष_धडे व कोळी महासंघ परिवार महाराष्ट्र राज्य .


