Headlines

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाला अकोला जिल्हा आदिवासी कोळी जमात बांधवांच्या वतीने पाठिंबा..

अकोला : (सचिन रामाघरे) – दिनांक १६ ऑक्टोबर रोजी कोळी महादेव जमात युवा एल्गार मोर्चा च्या माध्यमातून समाजातील सामाजिक, आर्थिक आनी राजकीय स्थितीचा आढावा घेत असताना आज ही सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी कोळी महादेव जमातीच्या लोकांचे जीवनमान हे हलाखीचे आहे. हे लक्षात येते,सातपुड्याच्या पायथ्याशी बालाघाटातिल महादेवाचा पुजक असलेला कोळी महादेव जमातिचे दाखले इतिहासात सुद्धा आढळतात तर ब्रिटिश संशोधकांनी सुद्धा या वर संशोधन केलेले आढळते. या भागातील कोळी महादेव जमातिचे लोक हे मासेमारी करत नसुन शेती करतात. त्यामुळे मासेमारी करणारा कोळी कोस्टल एरियातील लोकांना विषेश मागास म्हणून सर्वोच्च न्यायालयाने स्विकारले परंतू शासनाने १९५० च्या पुर्विचा दाखला मागितला असल्याने जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अडचणी येतात, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला आदिवासी कोळी महादेव जमातीच्या संदर्भात वेगवेगळ्या संघटनांनी शासन दरबारी दाखल करुन सुद्धा आजपर्यंत न्याय मिळाला नाही. आनी जो समाज अनुसूचित जमाती मध्ये येत नाही त्या समाजाला सर्वच योजनांचा लाभ देण्याची शिफारस आपल्या मंत्रिमंडळाने केली. मुळ आदिवासी यांना वंचित ठेवने योग्य नसल्याने जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमातिचे लोक आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना अकोला जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. दि. १० ऑक्टोबर २०२३ पासून उपोषनाला बसलेल्या लोकांना लवकर न्याय न मिळाल्यास अकोला जिल्हात सुद्धा मोठ्या प्रमाणावर आदिवासी कोळी महादेव जमातिचे लोक ऊपोषनाला बसणार आगामी काळातील सण उत्सव बघता प्रशासनावर कुठलाही ताण येऊ नये म्हणून प्रेषक जळगाव जिल्ह्यातील ऊपोषन कर्त्यांना लवकरात लवकर न्याय देऊन संपूर्ण एक आदिवासी कोळी महादेव जमातीच्या लोकांना न्याय देण्याची मागणी आपनास या पत्राद्वारे जिल्हाधिकारी करण्यात येत आहे. अन्यथा जळगाव जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीच्या लोकांच्या समर्थनार्थ अकोल्यात जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीचे समाजबांधव सुद्धा उपोषणाला बसणार आहे.

#बातमी त्यांच्याच शब्दात आहे. एक ही शब्द बदलेले नाहीत.. संपादक कोळी समाज संदेश 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *