सोलापूर: (सतीश घंटे) – महादेव कोळी समाज संघर्ष समिती सोलापूर जिल्ह्याचे वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री काँग्रेस चे नेते श्री.सुशीलकुमार शिंदे व सोलापूर शहर मध्य च्या आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्यासोबत महादेव कोळी समाजातील प्रश्न व समस्या यासाठी संघर्ष समिती अध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
या वेळी सोलापूर जिल्हा महादेव कोळी संघर्ष समितीचे सुधाकर सुस्लादी , रवी यलगुलवार , भारती कोळी, संजय कोळी , गणेश कोळी, हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
येणाऱ्या काळात विधिमंडळात मंत्रालय स्तरावर व मंत्रिमंडळ च्या बैठकीत सुद्धा तुमचे समाजाचे प्रश्न सोडवन्यासाठी आमची जी मदत लागेल ते आम्ही जरूर करू असे आश्वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी शिष्टमंडळास दिले .



