सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूर येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी आदिवासी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी इत्यादी समाजाच्या ज्वलंतप्रश्नी आंदोलन/उपोषण करायचे का या विषयावर चर्चा करण्याकरिता सोलापूर शहरातील प्रमुख मान्यवर समाज बांधव,नेतेगण, कर्मचारी यांना सामाजिक कार्यकर्ता अरुण भाऊ लोणारी यांनी या मिंटिगसाठी बोलविलो होते.
घटस्थापना असताना सुध्दा आम्ही बोलविलेल्या मिंटिगला उपस्थित असलेल्या व काही महत्त्वाचे कारणास्तव मिंटिगला उपस्थित राहू नशकलेल्या सर्व मान्यवर समाज बांधवांचे सुरुवातीला आभार मानून आरुण लोणारी यांनी मी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यास तयार असल्याचे सांगितले , यावर बाकीच्यांनी मत व्यक्त करण्यासाठी सूत्रसंचालक यांच्याकडून सांगण्यात आले. अनेकांनी महत्त्वाचे मनोगत व्यक्त केले.
बैठकीस मार्गदर्शन करताना श्री सुधाकर सुसलादी सर म्हणाले , अनुसूचित जमाती चे जात प्रमाणपत्र मिळत नाहीत म्हणून आपले लोक. आता प्रस्ताव पण सादर करीत नाहीत. तसेच जनरल प्रवरगातून शिक्षण काम धंदे चालू आहेत. आदिसंख्या मुळे कर्मचारी ही त्याकडे दुर्लक्ष करतो . त्याकरिता प्रांत अधिकारी निहाय जात प्रमाणपत्र मागणी अर्ज सादर होणे गरजेचे आहे. आपण आंदोलन करतो मागणी करतो पण शासन प्रशासन सी चर्चेत ते नसतात च. अगोदर आपल्या लोकांना जागृत करून
शिक्षक संघटनेचे रामभाऊ कोळी यांनी कर्मचारी यांचे अडचणी व सध्याची परिस्थिती यावर सविस्तर माहिती दिली,
मा.संतोष पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रांत अधिकारी निहाय एक हजार जात प्रमाणपत्र मागणी अर्ज सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. विविध समस्या च्याबाबत चर्चा होऊन शेवटीमा.रमेश घंटेनवारलु सर यांनी आभार व्यक्त केले.

तसेच यावेळी उपस्थित श्री दत्तात्रेय कांबळे साहेब व श्री विशालजी शिरसटराव सर यांना वाढदिवसानिमित्त उपस्थित समाज बांधवाच्या वतीने शुभेच्छा देवून सत्कार करण्यात आला .


