जळगाव: (प्रतिनिधी) आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी यांना सविंधानाने दिलेले अधिकार मिळविण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेल्या चार दिवसापासून चालू असलेले विविध आदिवासी कोळी समाज संघटनांच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या स्थळी , महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांनी आज भेट दिली.
दोघांनीही मंचावर उपस्थित संघटनांचे कार्यकर्ते तसेच उपोषणकर्ते .
1) श्री जगन्नाथ बाविस्कर
2 ) श्री संजय कांडेलकर
3 ) श्री नितीन कांडेलकर
4 ) श्री पद्माकर सपकाळे
5 ) श्री नितीन सपकाळे
6) श्री पुंडलिक सोनवणे यांच्याशी चर्चा केली .
चर्चेनंतर कोळी महासंघाचे अध्यक्ष आ. रमेशदादा पाटील संबोधित करताना म्हणाले की येथे आदिवासी कोळी जमातीला न्याय मिळावा म्हणून अन्नत्याग आंदोलन करणारे हे आमचे सहा शिलेदार तसेच उत्तर महाराष्ट्र, खानदेश , मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र या भागातील गोरगरीब आदिवासी कोळी महादेव टोकरे कोळी डोंगर कोळी जमातीचे माझे समाज बांधव २०१२ पासून म्हणजे मी कोळी महासंघाचा अध्यक्ष झाल्यापासून यासाठी आंदोलने मोर्चे केलेले आहेत २०१४ ला जेव्हा मागील आघाडी सरकार हे आमच्या आंदोलनास दाद न देता आमच्या मागण्या कडे
दुर्लक्ष करत होते हे जाणून , आम्ही २०१४ ला देता की जाता मोर्चा घेऊन भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला.
त्या मोर्चा मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी मंचावरून आश्वासित केले होते की आमचे सरकार आले तर लवकरात लवकर आम्ही हा प्रश्न निकाली काढू . सरकार आले कोळी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देवू म्हटले ते पण पुरेसे मिळाले नाही आणि समाजाचं एक साधा असलेल्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला गेला नाही, हे दुर्दैवाने सांगावं लागत आहे. आम्ही संयमाने आजपर्यंत वाट पाहतोय परंतु ठोस निर्णय होत नाही याची खंत आहे.
माननीय गिरीष जी , संकटमोचक हे बजरंग बली मारुतीला म्हटले जाते, तसेच तुम्ही या सरकारमधील संकटमोचक बजरंगबलीच आहात . आता आमच्या आदिवासी कोळी समाज बांधवांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझ्याबरोबर तुम्हीही घ्यावी त्यासाठी आपण वाटेल ते करूया मला तुम्ही साथ द्या ही अपेक्षा व्यक्त करत
न्याय मिळत नसल्याने संयम सुटत आहे , त्यामुळेच असे तीव्र आंदोलनात सगळीकडे होत आहेत . समाजात नाराजी पसरलेली आहे याची जाणीव आपण माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजित दादा पवार व मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांना करून देऊन लवकरात लवकर आमचा प्रश्न सोडवावा अशी विनंती केली.
आमदार रमेश दादा पाटील यांच्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रबोधन करताना सांगितले की
मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय बैठक लावून आपण कोळी समाजाचा हा प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन देत आंदोलन स्थळावरील उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली . मंत्री गिरीश महाजन बोलत असताना मंचासमोरील कोळी समाज कार्यकर्ते ॲड. हे भगवा गणेश सोनवणे यांनी चोपड्या मध्ये आमदार टोकरी कोळी समाजाचा असतानाही उपविभागीय अधिकारी चोपडा एकही प्रमाणपत्र देत नाही याबाबत काहीतरी निर्देश द्या अशी मागणी केली.


त्यांच्या मागणीमुळे झालेला गोंधळ ऐकून, मंत्री महोदय म्हणाली की, हे बघा मी एकटा यामध्ये काही निर्णय देऊ शकत नाही. यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील .आणि त्यांचे अधिकार उच्च स्तरावरील लोकांकडे आहेत आणि हा निर्णय सार्वजनिक चर्चेतूनच सुटेल आणि तो सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतोय असा गोंधळ झाला तर मी तुमचा गोंधळ ऐकून माझं काहीही म्हणणं नाही असं सांगून निघून जाईन त्याने प्रश्न सुटणार आहे का असे प्रतिपादन केले. त्यानंतर मंचा वरील मान्यवरांनी मंचा समोरील आदिवासी कोळी समाज बांधवांना आव्हान केले की मंत्री महोदय जे बोलत आहे ते आपण शांतपणे ऐकूया आपण शिस्त न सोडता गोंधळ गर्दी न करता लोकशाही मार्गाने आपला प्रश्न सोडवतोय त्यात मंत्री महोदय काय म्हणतात हे ऐकणेही जरुरी आहे असे आव्हान केल्यानंतर सर्वांनी आमदार गिरीश महाजन यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.
गिरीश महाजन यांनीही हा प्रश्न सोडवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करेन तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा अनेक आंदोलने झाल्यामुळे तेच मी शासकीय कामानिमित्त परदेशी गेल्यामुळे येथे येण्यास उशीर झाला असला तरी उच्चस्तरीय बैठक
लावून याचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न मी जरूर करीन असे आश्वासन देत सहाही उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडावे अशी शासनाच्या विनंती वतीने विनंती केली.
पण उपोषणकर्त्यांनी आपण बैठक लावावे बैठकीत निर्णय होईल तेव्हाच आमच्या अन्न त्याग आंदोलनाची सांगता होईल. आपण येथे येऊन आमचे मनोधैर्य वाढवले त्याबद्दल
आम्ही तुमचे आभारी आहोत. आमच्या वतीने आपण शासन दरबारी प्रयत्न करावा अशी विनंती. सर्व आदिवासी कोळी जमातीच्या सामाजिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांनी केली.
महत्वाचे: मुद्दे
१)कोळी समाजाच्या शिष्टमंडळासह मुंबईत उच्चस्तरीय बैठक : ना. गिरीश महाजन
२) ”कोळी समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आदिवासी विकास मंत्री व अधिकार्यांच्या सोबत समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्यात येणार आहे !” असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले.


