दि. 08/09/23: निलंगा :-रोजी शिवाजी चौक निलंगा येथे सोलापूर येथे सकल धनगर समाज आरक्षण संदर्भात निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ गेले असता महसूल मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देत असताना भंडारा लावला म्हणून भाजप कार्यकरत्यांनी लाथाबूक्यानी खालीपडे पर्यत मारहाण केली. या घटनेचा सकल धनगर समाज व वंचित
बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध व चौकामध्ये विखे पाटलाच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे निलंगा तालुका अध्यक्ष सुनिल भाऊ सुर्यवंशी,युवा जिल्हा अध्यक्ष युवराज जोगी,तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,संघटक दिनेश शिंदे, प्रसिध्दी प्रमुख श्रीपाद कुलकर्णी ,सहसंघटक अरूण सुरवसे,हनमंत कांबळे,सखाराम घोलप,शहर अध्यक्ष महमद लालटेकडे,उपाध्यक्ष आकाश दोरवे, शुभम सुर्यवंशी, बनसोडे,अमोल सुर्यवंशी व अदि कार्यकरते मोठ्या संखेने उपस्थित होते.


