जळगाव:-आदिवासी कोळी महादेव, टोकरे कोळी , मल्हार कोळी या अनुसूचित जमातीच्या जळगाव येथील समाज बांधवांनी गेली 26 दिवस अन्नत्याग आमरण उपोषण प्रारंभ करण्यात आले होते.
त्याच अनुषंगाने 20 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाने , आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित गिरीष महाजन अनिल पाटील या मान्यवरांसह आदिवासी कोळी समाजातील प्रमुख संघटनाचे पदाधिकारी यांच्या सह बैठक होऊन काही सकारात्मक निर्णय झाले होते.
शासनाने ठराविक निर्णय करण्यात आले होते पण कोळी नोंदीवरून सरसकट कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र व रक्त नात्याच्या पुराव्यावरनं वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी शासनाने जीआर काढण्याचे आश्वासन देवून आदिवासी कोळी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन . असलेले त्याच बैठकीचे मिनिट्स कॉपी घेऊन माननीय आमदार श्री रमेश दादा पाटील व मंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव येथे जाऊन उपोषणकर्त्या सोबत चर्चा करून
सरकार आपल्या बाजूने सकारात्मक निर्णय घेण्यास तयार आहे तरी आपण उपोषण मागे घ्यावे अशी विनंती आमदार रमेशदादा पाटील आणि मा. मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली त्यानंतर

उपोषणकर्त्यांनी त्यांच्या विनंती वरून आज जळगाव येथील चालू असलेले अन्नत्याग उपोषण मागे घेण्यात आले ची माहिती प्रभाकर अप्पा सोनवणे मोहाडी यांनी दिली आहे.



परत आंदोलन करण्याची गरज पडु नये
कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रमेश दादा पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून जळगाव येथे चालू असलेले आपल्याच समाज बांधवांचे अन्नत्याग उपोषण दादांच्या प्रयत्नांमुळे शासनाला झुकावे लागले.दादा आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे.
खूप खूप अभिनंदन दादा 🙏🙏🙏🙏