धुळे प्रतिनिधी:-आदिवासी वाल्मीकलव्य सेनेच्या धुळे येथे झालेल्या बैठकीमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आदिवासी कोळी जमातीतील टोकरे कोळी, कोळी महादेव , मल्हार कोळी, डोंगर कोळी, इत्यादी अनुसूचित जमातींना एक दोन तालुके वगळता साऱ्या महाराष्ट्र भर जात प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही आणि वैधता प्रमाणपत्र तर पडताळणी समिती कडून सर्रास दिलेच जात नाही. गेल्या अनेक वर्षापासून याबाबत संघर्ष करीत असलेल्या या संघटनेच्या मुळे काही प्रमाणामध्ये काही मोजक्या लोकांना फक्त प्रमाणपत्र मिळालेले आहेत , पण वैधता प्रमाणपत्र मिळाले नाहीत .
त्यामुळे गेल्या १५वर्षभरात काढलेल्या प्रमाणपत्राचा काहीही उपयोग सामाजिक आर्थिक आरक्षणासाठी झालेला नसल्यामुळे समाजाला न्याय मिळाला नाही . आदिवासी कोळी जमायीला न्याय मिळवून घेतला पाहिजे त्यासाठी संघर्षाचा केला पाहिजे असे संगटणेच्या बैठकीत सार्वमत आल्याने…

आदिवासी वाल्मीकलव्य सेनेच्या वतीने धुळे येथील एकविरा मंदिरापासून ते मंत्रालयापर्यंत संघर्ष पदयात्रा काढण्याचा निश्चय आणि ठराव झाल्याचे संस्थापक अध्यक्ष शाणाभाऊ सोनवणे यांनी आज घोषित केले आहे केले आहे. जर या आंदोलनाची दखल सरकारने नाही घेतली तर मुंबई येथे समुद्रामध्ये जलसमाधी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे
तसेच या संघर्ष यात्रेत फक्त खानदेश तर असणार आहे पण हा अन्याय मराठवाडा विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील ही लोकांवर गेल्या २० वर्षापासून अन्याय होतोआहे. त्यांनीही आदिवासी वाल्मीकलव्य सेनेच्या या आंदोलनात सहभागी व्हावे समाजासाठी काढलेल्या आंदोलनाला तमा महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या लहान हे कार्य करणाऱ्या संघटनाने पाठिंबा दिला निश्चित आपणाला न्याय मिळेल असे ठाम मत व्यक्त केले आहे.


