Headlines

आदिम विकास परिषदेच्या वतीने जळगाव अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा… मराठवाड्यात ही लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठवाडा अध्यक्ष रमेश पिट्टलवाड यांनी दिला..

आज आदिम विकास परिषदेच्या वतीने जळगाव येथील अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाडा अध्यक्ष रमेश पिठ्ठलवाड यांच्या नेतृतवाखाली परभणी बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ४००की.मी. चां प्रवास करून आंदोलन स्थळाला भेट दिली.

मंचावरून भाषण करताना त्यांनी सांगितले की माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आदिवासी संचालक स्व. गोविंद गारे यांना लावलेल्या निकषानुसार विस्तारीत क्षेत्रातील आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी जमातीना समान न्यायाने नोंदी कोळी असल्यातरी विना अट जात वैधता प्रमाणपत्र द्यावे , कोळी नोंदीवरून जात प्रमाणपत्र अवैध करू नये. या मागणीसाठी जळगांव येथे सुरु असलेल्या आ मरण अन्नत्याग आंदोलन 10 ऑक्टोबर पासून सुरू असून आज विसाव्या दिवशी आदिम विकास परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष रमेश पिठ्ठलवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन स्थळी भेट देऊन पाठींबा दिला. आणि मराठवाड्यात ही तीव्र आंदोलनाची ठिणगी पेठवण्याचा निर्धार पक्का करून लवकरच तारीख निश्चित करू असे मत व्यक्त केले .

जळगाव जिल्ह्यात आदिवासी कोळी जमातीचे आमरण अन्नत्याग सत्याग्रह, जळगाव यांना समर्थन देण्यासाठी परभणी आदिम विकास परिषद टीमचे रमेश पिठ्ठलवाड यांच्या सोबत प्रा.मारेवाड , सुनील बळवंते., पी एम. कज्जेवाड , अच्युतराव सोगे, राम चिंचलवाड, सुनिल पुटेवाड, पी. डी. भंडारवाड, रंगनाथ मरपडवाड, एम. बी. सुरवसे, पंढरी दासरवाड , घुमनवाड , , शिवाजी पिटले , आदी आदिम विकास परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *