कोळी जमातीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन
सांगली: गेल्या २० दिवसा पासून जळगांव येथील सुरु आलेल्या आदिवासी कोळी जमात समन्वय समिती च्या आमरण उपोषणास पाठींबा देणे व राज्यातील सर्वच कोळी जमातींना अनुसुचित जमातीचे लाभ मिळणे या प्रमुख मागणी साठी सांगली जिल्हाधीकारी कार्यालया समोर दि.03/11/2023 रोजी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती सांगली जिल्ह्यातील कोळी समाजाचे नेते हिम्मत कोळी यांनी दिली आहे. त्यांच्या सह जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमातीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. मागण्याचे निवेदन खालील प्रमाणे आहे.
#कोळी जमातीस न्याय मिळण्यासाठी खालील मागण्या मान्य होणे करिता दि.03/11/2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली समोर सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत धरणे आंदोलन.
1) 1950 पूर्वीच्या नोंदी इंग्रज काळातील सन 1901 ते 1941 कालावधीतील जनगणना आयोगाच्या आदेशामुळे केवळ “कोळी”म्हणून झालेल्या आहेत. त्यामुळे कोळी नोंदीवरून टोकरे कोळी, कोळी ढोर, कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीचे गटाला वैधता, व प्रमाणपत्र देण्यात यावे.
2) “सन 1950 पुर्वीच्या जातीच्या नोंदीच्या पुराव्याचा आग्रह धरु नये” असे शासन परिपत्रक व मा.उच्चन्यायालयाचे आदेश असल्यामुळे केवळ सन 1950 पूर्वीचा फक्त रहिवाशी पुरावा 7/12, उतारा/प्रॉपर्टी कार्ड उतारा गृहीत धरून जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.
3) SBC च्या यादी मध्ये केवळ समुद्र किनारी (कुलाबा आणि ठाणे) पवंशपरंपरेने मच्छीमारीचा व्यवसाय करणारे मच्छीमार सोनकोळी यांचाच समावेश आहे. सन 1976 मध्ये केंद्र शासनाने पारित केलेल्या अनुसूचित जमातीच्या (ST) यादीमध्ये कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरी कोळी, ढोर कोळी या सर्व जमाती समाविष्ट आहेत. सांगली जिल्हातील कोळी हे समुद्र किनारी राहणारे किंवा मच्छीमारीचा व्यवासय करणारे सोनकोळी नाहीत. त्यामुळे राज्यातील समुद्र किनारी राहणारे व मच्छीमारीचा व्यवसाय करणारे सोनकोळी वगळता सर्व कोळी जमातीला SBC मधुन वगळून मुळ अनुसूचित जमातींचा लाभ देण्यात यावा.
आपले विश्वासू
हिंमत कोळी ,जयसिंग कोळी, संजयकुमार कोळी (आफ्रोह), उमेश माने, अमोल नांदेकर, संतोष कोळी, रामा कोळी( तात्या)सौ.शैलजा कोळी, सौ.सुनंदा कोळी, सौ.सुमन खोत, सौ.बी.टी.कोळी,शशिकांत कोळी,अन्नू प्रभू कोळी, नरेंद्र कोळी, महादेव कोळी -जत, भगवान सोनंद, कृष्णा कोळी, प्रकाश कोळी, डॉ संजय कोळी, सुनील कोळी, नामदेव कोळी, रुक्मिणी आमबीकर, विजय कोळी, प्रदीप कोळी, अशोक नाना कोळी, संकेत आलासे, मिरज तालुका, दिलीप पाटील, हणमंत पाटील, बजरंग पाटील,पांडूरंग पाटील, हाणमंत पंढरे, संभाजी पाटील, मोहन पाटील, शिवराम पाटील – पुणदी, खेमराज पडवे, अंकुश सोनकुसळे, अजय भानुसे, रविंद्र भगत-सांगली, शशिकांत कोळी, शहाजी कोळी, आनंदा राजमाने, विलासराव मस्के सर, विनोद कोळी-तासगाव,



