कोळी महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष पदी विठ्ठलराव इरले आणि सोशल मीडिया प्रमुख पदी सतीश धडे
लोणावळा: दिनांक २ -३ डिसेंबर रोजी लोणावळा येथे आदिवासी कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाचे राज्यस्तरीय दोन दिवसीय चर्चा सत्र राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले. या चर्चा सत्राच्या शेवटच्या दिवसी महाराष्ट्रातील कोळी महासंघाच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यानी सर्व संमतीने दोन…


