Headlines

विधान परिषद सदस्य आमदार मा. श्री. रमेशदादा पाटील यांना कोळी महासंघ संघटने च्या माध्यमातून केलेल्या समाज कार्याबद्दल समाज भूषण पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला…

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार मा. श्री. रमेशदादा पाटील यांना कोळी महासंघ संघटने च्या माध्यमातून केलेल्या समाज कार्याबद्दल समाज भूषण पुरस्कार 2023 प्रदान  करण्यात आला.

नाशिक येथील सामाजिक संस्था “आदिवासी कोळी जमात बहुउद्देशीय डेव्हलपमेंट फाऊंडेशन नाशिक” यांच्या वतीने कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार मा. श्री. रमेशदादा पाटील यांना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संस्थेचे संस्थापक श्री युवराज सैंदाणे आणि अध्यक्ष श्री नितीन शेवरे यांच्या हस्ते तसेच कोळी महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष श्री गुलाबराव गांगोडे व उपाध्यक्ष श्री गणेश राजकोर यांच्या प्रमुख उपस्थितीत बहुसंख्य समाजबांधवांच्या उपस्थित असतांना प्रदान करण्यात आला!

माणूस कोठे पोहोचला, यापेक्षा कुठून कुठे पोहोचला याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आमदार मा. रमेशदादा पाटील.

अत्यंत गरीब कुटुंबात दादांचा जन्म झाला, खेडेगावात शिक्षण घेऊन आज ते उद्योगपती म्हणून स्वतःची ओळख निर्माण करून घेतली. चांगली नोकरी व उद्योग करून स्वतःचा चांगला संसार थाटला असता परंतु तो सोडून समाज कार्यासाठी, सुलभभावनेचा त्याग करून समाजाचा संसार थाटण्याचा निर्धार दादांनी केला समाजासमोर त्यांनी तशी शपथ घेतली आणि समाजाचा विकास करण्यासाठी विडा उचलला!

दादांचा प्रवास म्हणजे त्यांच्या चळवळी, विचार, स्वभाव, आणि कार्यशैलीवर सांगण्यासारखे खूप काही आहे. कोणतेही पद नसतांना तळागाळातील लोकांसाठी निर्भयपणे संघर्ष करून समाजासाठी झटत राहीले, त्यांची केलेली ही समाजसेवा आम्हाला खूप प्रेरणादायी ठरणार आहे त्यामुळे दादांचा फुल नाही पण फुलाची पाकळी देऊन (समाजभूषण पुरस्कार 2023) देऊन त्यांच्या समाजसेवेला प्रोत्साहित करण्याचा थोडासा प्रयत्न!

आमदार मा.श्री. रमेशदादा पाटील यांना “समाजभूषण पुरस्कार 2023” प्रदान करतांना आदिवासी कोळी समाज बहुउद्देशीय डेव्हलपमेंट फाऊंडेशन नाशिकचे संस्थापक युवराज सैंदाणे, अध्यक्ष नितीन शेवरे, कोळी महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष गुलाबराव गांगोडे, उपाध्यक्ष गणेश राजकोर, सचिन धुळे, योगराज रौंदळ,लक्ष्मण भवर,पी. के. खराटे, भोईसाहेब, राहुल ठाकरे, हर्षल भवर, बापू धुळे, पवन लिलके, संदिप गोतरणे आदी सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *