Headlines

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामाविष्ट होण्याची संमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामाविष्ट झाली नव्हती.

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते. हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते.[१] त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामाविष्ट होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम चालू झाला होता.

भारताचे तात्काळीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निझाम शासनाच्या विरोधात पोलीस कार्यवाहीची घोषणा केली. 11 सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत मेजर जनरल जे.एन चौधरीच्या नेतृत्वाखाली पाच दिशेने निझाम संस्थानावर कारवाई चालू झाली. मुख्य सैन्य सोलापूरकडून शिरल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरू झाल्यावर २ तासांत नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वारंगळ, बीदर विमानतळावर भारतीय सैनिकांनी हल्ले केले. १५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करून सैन्य पुढे निघाल्या. भारतीय सैन्यापुढे रझाकार फार वेळ टिकू शकले नाहीत. निजामी सैन्य माघार घ्यायला लागले आणि कासीम राजवीला अटक झाली. शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादचे सैन्यप्रमुख जन अल इद्गीस यांनी शरणांगती स्वीकारली आणि निझाम पराभव मानले आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला..

मराठवाडा मुक्ती संग्राातील  देशाच्या एकतेसाठी शहीद झालेले आणि लढलेले  सर्व  ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकाना विनम्र अभिवादन…

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा … सतीश धडे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *