परळी: आज बीड जिल्ह्यातील परळी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परळी येथे आले होते. गोपीनाथ गडावर भाजप च्या नेत्या पंकजाताई या सुद्धा त्यांच्या सोबत च होत्या. त्या ठिकाणी कोळी महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष महादेव कंडूकटले यांनी आपल्या परळी येथील पदाधिकारी यांच्या सोबत जाऊन जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे या करिता निजाम सरकारचे काळातील पुरावे नोंदी या कोळी असल्या तरी आम्ही कोळी महादेव मल्हार कोळी आणि शेड्युल ट्राईब आहोत हे सांगितले असून ही आमच्या मराठवाड्यात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नसल्याने आमच्या आदिवासी कोळी समाज बांधव शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकासापासून वंचित आहेत. तरी त्या संदर्भात योग्य तो शासन निर्णय काढून आमच्या अदिवासी कोळी समाजाला न्याय द्यावा.
मा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी निवेदन घेवून त्याबाबत लवकरच निर्णय घेवू असे शिष्टमंडळास आश्वासन दिले.


