Headlines

कोळी महासंघाच्या दोन दिवसीय संघटनात्मक चर्चासत्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठराव मंजूर… पदाधिकारी आणि नेत्यांनी खुली चर्चा केली, खेळीमेळीच्या वातावरणात केला कोळी महासंघाचे संघटन मजबूत करण्याचा संकल्प..

लोणावळा : कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार श्री. रमेशदादा पाटील यांच्या सूचने नुसार,  कोळी महासंघाच्या महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लोणावळा येथे विशेष संघटनात्मक चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.

या दोन दिवसीय संघटनात्मक संरचना , बांधणी, नेत्यांसह,पदाधिकारी कार्यकर्ते यांची कर्तव्ये जबाबदारी शिष्टाचार यांचे पालन  याबाबत विशेष चर्चा करून त्याबाबत सगळ्यांनी काही ठराव मंजूर केले. त्यात सामूहिक विचार विमर्श आणि सामूहिक हिताच्या दृष्टीकोनातून कायम समाज कार्य करत संघटनात्मक संरचना मजबूत करण्याची गरज बऱ्याच मान्यवरांनी बोलून दिली .

या विशेष संघटनात्मक चर्चासत्रात राज्याच्या ३० जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तालुका पातळीवरील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना ही निमंत्रित करण्यात आले होते. राज्याच्या महसूल विभागा प्रमाणे वर्गवारी करून पाच विभागातील जिल्हानिहाय पदाधिकारी यांच्या कडून लोकसभा, विधानसभा जिल्हा तालुका अध्यक्षांच्या नियुक्ती आणि कार्याचा आढावा घेण्यात आला .  खानदेश, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या महसुली विभागामध्ये संपर्कप्रमुख आणि त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांनी घेतला.

पहिल्या दिवशी व  दुसऱ्या दिवशी ही ११ मुद्द्या वर आधारित चर्चासत्राचे सूत्र संचालन युवा नेते ॲड.चेतन पाटील यांनी केले.त्यांच्या रोख ठोक शैलीमुळे बैठक मुद्द्यावर च  झाली,  बाष्कळ चर्चेला आवर घालण्याच्या त्यांच्या तंत्रामुळे मीटिंग मध्ये विषयांतर जाहले नाही.

प्रा.सुरेश पाटकर , सतीश धडे,  पहाडसिंग सुरलकर, अरुण भाऊ लोणारी , रामदास कोळी , अभय पाटील रायगड, अंजलीताई अभंग्राव, बाळासाहेब सैंदाने,  माधुरी सोनवणे , रामेश्वर सुरडकर, श्रीकृष्ण पिटले, गोविंद सोदले , पुरुषोत्तम झाल्टे , माधुरी मारके, संगीता धोंडगे, महादेव सलके, निलेश कानडे, गजानन मरकंटे, चंद्रकांत घोडके, बाळासाहेब माने, बाळासाहेब शिरगुरे,  पोपट पुजारी,  उज्वला साबळे, अमोल नांद्रेकर,कुमार कोळी, अर्जुन मेस्त्री, देवानंद गोगार यांनी चर्चा करताना संघटनात्मक बाबीवर आपली मते मुद्द्याच्या अनुषंगाने मांडली.

पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अरुण भाऊ लोणारी तसेच कोल्हापूरचे रामदास कोळी यांनी नेताच्या व पदाधिकारी यांच्या चुका मागील अनुभव सांगत त्यावरील उपाययोजना शिस्तीची ची अपेक्षा  व्यक्त केली. चर्चा सत्राची यशस्वी सांगता करीत असताना   कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बळावर आपण येत्या सहा महिन्यात कोळी समाजाचे संघटन इतके मजबूत करू की राजकीय पक्षांना पण आपल्या  अस्तित्वाची दखल घ्यावी लागेल. ही ताकत निर्माण करण्यासाठी आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या सगळ्या प्रमुख पदाधिकारी निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या विशेष परिश्रमाची सहकार्याची गरज आहे . आपल्या समाजाच्या सामूहिक हिताच्या व आपल्या वैयक्तिक हिताच्या दृष्टीकोनातून हे संघटन मजबूत करण्याचा संकल्प आजच्या या चर्चा सत्राच्या निमित्ताने आपण करूया, अशी भूमिका अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांनी व्यक्त केली.चर्चा सत्रातील मनोगतात प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीचा अजेंडा आणि मुद्द्यावरच जोर दिला.त्याच बरोबर कर्मचारी विद्यार्थी यांच्या सह आपल्या सगळ्यांच्या विकासात अडथळा  करणारा , अनुसूचित जमातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र सुलभ मिळणे हा प्रश्न सोडवणे आपला खरा केंद्रबिंदू आहे त्यावर आपले काय प्रयत्न चालले आहेत हे ॲड. चेतन पाटील यांनी सांगितले. अनुसूचित जमातीमध्ये असताना देखील त्याचे लाभ सुलभ रीत्या मिळत नाहीत म्हणून आपल्या विरोधात जाणीव पूर्वक उभ्या राहिलेल्या शासन प्रशासन यंत्रणेला धक्का देण्यासाठी  संघटनात्मक एकजूट,  मजबुती आणि राजकीय दबाव दाखविणे आवश्यक आहे . त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत . आपण महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी समाजाला सामजिक हितासाठी राजकीय दृष्ट्या सक्षम करण्यासाठी या चर्चा सत्राच्या माध्यमातुन कार्यप्रणाली तयार करून तिचा अवलंब करून आपले प्रश्न सोडवून घेवू असे आश्वासित केले.

आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोळी महासंघाच्या वतीने उमेदवार उभे करण्यात येणार का? करावेत का ?यावर ही चर्चा झाली त्यावर योग्य वेळी योग्य ती राजकीय भूमिका घेतली जाईल असे राज्यस्तरीय  पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आपल्या प्रश्नांची सोडवणूक नाही केली तर, उमेदवार उभे केले जाऊ ही शकतात,  त्यादृष्टीने सक्षम पदाधिकारी यांनी तयारी करण्याच्या सूचना देखील यावेळी आमदार रमेशदादा पाटील यांच्या वतीने देण्यात आल्या .

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा, युवा प्रदेशाध्यक्ष अँड.चेतन पाटील, कार्याध्यक्ष श्री. प्रकाश बोबडी, सरचिटणीस श्री. राजहंस टपके, उपनेते श्री . देवानंद भोईर, उपाध्यक्ष शिवशंकर फुले प्रा.सुरेश पाटकर सहसचिव सतीश धडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला.

चोपडा विधानसभा मतदार संघाचे वैयक्तिक काम घेवून  बाळासाहेब सैंडणे यांच्या सोबत आलेले भिल्ल संघटनेचे अध्यक्ष राजाराम साळवी हे ही या बैठकीच्या पहिल्या दिवशी उपस्थित होते. त्यांनी कोळी महासंघाच्या अश्या नावीन्यपूर्ण खुल्या चर्चा सत्राचे आयोजन करण्याची दिशा आम्हास दिली तसेच चर्चेत सहभागी करून घेतले त्याबद्दल रमेश दादा पाटील यांचे आभार व्यक्त केले

असा कार्य अहवाल संपर्क प्रमुख हे प्रत्येक जिल्ह्यात नेमून प्रत्येक महिन्यातून एकदा घेण्यात आला तर नेमके संघटनेच्या जिल्हा तालुका स्तरावर काय चालेले आहे हे ज्ञात होत राहील अशी सूचना केली देवानंद भोइर आणि राजहंस टपके यांनी केली. ती सर्वानुमते मान्य करणेत आली.

सोशल मीडियावर होत असलेल्या अपप्रचार आणि बदनामी याला उत्तर देण्याची गरज असल्याने सोशल मीडिया प्रमुख म्हणून सतीश धडे यांनी काम करावे हा ठराव युवा नेते ॲड चेतन पाटील यांनी  उपस्थित प्रमुख पदाधिकारी यांच्या समोर दोन्ही दिवशी मांडला त्यास सरचिटणीस राजहंस तपके यांनी अनुमोदन देत त्यावर चर्चा झाल्या नंतर तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.जिल्हा स्तरावर लोकांच्या संपर्कासाठी कोळी महांघाचे कार्यालय असेलच पाहिजे हा ही ठराव मांडण्यात आला यासारखे अनेक विषयावर जे  कोळी महासंघाचे पुढील सामजिक, संघटनात्मक आणि राजकीय हिताच्या दृष्टीकोनातून योग्य असलेले ठराव  जे जे कार्यकर्ते पदाधिकारी यांचे द्वारे ठराव मांडण्यात आले त्यावर खेळीमेळीच्या वातावरणात सांगोपांग चर्चा करण्यात आली व त्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्य कार्कारिणीच्या संमतीने मजूर करण्यात आले.दोन्ही दिवसाच्या चर्चासत्रात राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील आणि राज्यस्तरीय कार्यकारणीतील प्रमुख नेते, सरचिटणीस राजहंस टपके, युवा नेते ऍड. चेतन पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी यांनी पूर्णवेळ सहभाग घेवून तमाम महाराष्ट्रातील पदाधिकारी यांचे म्हणणे ऐकून घेऊन अनेक ठराव जे संघटन मजबूत करण्यासाठी योग्य वाटले ते मंजूर केले.

हे सगळे ठराव फक्त संघटन मजबूत व्हावे यासाठीच करण्यात आले आहेत. हे जेवढे तुम्हाला बंधनकारक आहेत तेवढेच मलाही असे ही राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांनी सांगितले.

पदाधिकारी आणि नेत्यांनी खुली चर्चा केली, खेळीमेळीच्या वातावरणात केला कोळी महासंघाचे संघटन मजबूत करण्याचा संकल्प..

कोळी महासंघाच्या दोन दिवसीय संघटनात्मक बांधणी चर्चा सत्राचा समारोप राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या मनोगताने करण्यात आला आभार प्रदर्शन ॲड. चेतन पाटील आणि राजहंस टपके यांनी केले.

 

 

One thought on “कोळी महासंघाच्या दोन दिवसीय संघटनात्मक चर्चासत्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठराव मंजूर… पदाधिकारी आणि नेत्यांनी खुली चर्चा केली, खेळीमेळीच्या वातावरणात केला कोळी महासंघाचे संघटन मजबूत करण्याचा संकल्प..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *