Headlines

कोळी महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष पदी विठ्ठलराव इरले आणि सोशल मीडिया प्रमुख पदी सतीश धडे

लोणावळा:  दिनांक २ -३ डिसेंबर रोजी लोणावळा येथे आदिवासी कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाचे राज्यस्तरीय दोन दिवसीय चर्चा सत्र राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले.

या चर्चा सत्राच्या शेवटच्या दिवसी महाराष्ट्रातील कोळी महासंघाच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यानी सर्व संमतीने दोन नवीन पदाची निवड केली.  त्यास सरचिटणीस राजहंस टपके आणि युवा नेते ऍड. चेतन पाटील, उपाध्यक्ष शिवशंकर फुले व प्रा. सुरेश पाटकर आणि ऍक्शन कमिटी सदस्य चद्रकांत घोडके  यांनी अनुमोदन दिले.

यावेळी उपनेते देवानंद भोइर, पोपट पुजारी, बाळासाहेब माने, अरुण लोणारी,अभय पाटील,  श्रीकृष्ण पिटले,  पंडित फुल्सुरे, माधव पुनवाड, माधुरी सोनवणे, अनुजा पाटील, मधुरी मारके, महादेव कंडूकटले , दत्ता मोतीबाने, तुषार शिंदे, कांबळे गुरुजी, रामदास कोळी, संगीता धोंडगे, उज्वला साबळे, महादेव सलके, भालचंद्र वर्सोलकर, कुमार कोळी, बाळासाहेब शिर्गुरे, संतोष श्रींगोंडा पाटील, कर्मचारी नेते रामभाऊ कोळी हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

नवनियुक्त पदाधिकारी यांचे पुष्गुच्छ देवून राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी श्री विठ्ठलराव इर्ले आणि सतीश धडे यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *