Headlines

समाज उन्नतीसाठी सेवकांना मिळणारे पुरस्कार हे प्रेरक व ऊर्जादायी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नाशिक, दि. 29 : आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आदिवासी विकास विभागासोबतच आदिवासी सेवक हा महत्वाचा दुवा आहे. सेवाभावी मनोवृत्तीतून आदिवासी सेवक व सेवा संस्था या दुर्लक्षित समाजास मदत करीत असतात. समाज उन्नतीसाठी या सेवकांना मिळणारे पुरस्कार हे त्यांच्यासाठी प्रेरक व ऊर्जादायी असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

महाकवी कालिदास कलामंदिरात आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्थांना सन 2019 ते 2022 या चार वर्षाच्या राज्य पुरस्कारांचे आज मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते एका सोहळ्यात वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळीमाजी आमदार उत्तम इंगळेशिवराम झोलेएन.डी. गावितसंजय कुलकर्णीसंतोष ठुबेसुदर्शन नगरे यांच्यासह पुरस्कारार्थींचे कुटुंबीयनातेवाईकआदिवासी विकास विभागाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

डॉ. गावित म्हणाले कीआदिवासी हा समाजाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्यांपासून इतरांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल. आपल्या हातून यापुढेही समाजाची सेवा घडत राहो व पुरस्कार्थींनी यापुढेही जोमाने काम करावे ही अपेक्षा मंत्री डॉ. गावित यांनी व्यक्त केली. ज्या आदिवासी बांधवांना स्वतःचे घर नाही त्यांना येत्या दोन वर्षात हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची इच्छा असेल त्यांच्यासाठी सहावीपासूनच अॅकॅडमी सुरू करणार असून स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने त्यांची तयारी करून घेतली जाणार आहे. डिजिटल माध्यमातून शिक्षणासाठी  शिक्षकांनाही आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. बिरसा मुंडा रस्ते जोड योजनेच्या माध्यमातून सर्व वाड्यावस्त्यापाडे बारमाही रस्त्याने जोडण्यात येतील. आदिवासी बांधवांसाठी वनोपज स्थानिक पातळीवर संकलित करून त्यावर प्रक्रिया करून

उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मदत करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया केलेले उत्पादने आदिवासी विकास विभाग खरेदी करण्यासाठी विक्री व्यवस्था उभारली जाणार आहे. आदिवासी बांधवांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी विभाग योजनाही राबवित आहेत, असेही मंत्री डॉ. गावित यांनी  सांगितले.

असे आहेत आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कारार्थी

२०१९–२०२० २०२०–२०२१ २०२१–२०२२ २०२२–२०२३

१. श्री. रघुजी येसाजी गवळी, नाशिक १६. श्री. अनिल नामदेव वाघ, नाशिक ३१ श्री. ज्ञानेश्वर सिताराम भोये, नाशिक ४६ श्री. दत्तात्रय हनुमंता मुठे, अहमदनगर

२. श्रीमती अनिताताई रामदास घारे, नाशिक १७. श्री. गमन ईसन सोनवणे, नाशिक ३२ श्री. सुरेश पुनाजी पवार, , नाशिक ४७ श्री. देवरे श्रावण नानाजी, नाशिक

३. श्री. उद्धव पांडुरंग मोरे, नाशिक १८ श्रीमती सविता जगदीश जयस्वाल, नंदुरबार ३३ श्री. गोसा बहादूर खर्डे, नंदुरबार ४८ श्री. ईश्वर संतोष माळी, नंदुरबार

४. श्री. जितेंद्र बापूराव चव्हाण, जळगांव १९ श्री. रवींद्र नागो भुरकंडे, पालघर ३४ श्रीमती. सविता सहदेव मते, पुणे ४९ श्री. युवराज दगाजीराव पाटील, नंदुरबार

५. डॉ. शशिकांत जगन्नाथ वाणी, नंदुरबार २० श्री. नामदेव लक्ष्मण नाडेकर, पूणे ३५ श्री. किसन मारुती तळपाडे, मुंबई ५० श्री. मधुकर श्रीराम आचार्य, नाशिक

६. श्री. नुरानी हैदरअली कुतुबअली, नंदुरबार २१ श्री. तुळा रुपा लांघी, पूणे ३६ श्री. महादेव आंबो घाटाळ, ठाणे ५१ सौ. शिला सुरेश उईके, गोंदिया

७. श्री. दगडू रामचंद्र सोनवणे, नाशिक २२ श्रीमती प्रमिला उध्दव मसराम, ठाणे ३७ श्री. नागोराव उरकुरडा गुरनुले, नांदेड ५२ श्री. जितेंद्र चंद्रसेन पाडवी, नंदुरबार

८. श्री. रुपसिंग बिरबा पाडवी, नंदुरबार २३ श्री. अशोक म्हाळू इरनक, ठाणे ३८ श्री. ठकाजी नारायण कानवडे, अहमदनगर ५३ श्रीमती सीता गणपत किरवे, पुणे

९. श्री. धाकल जानू खुताडे, पालघर २४ श्री. कडूदास हरिभाऊ कांबळे, बीड ३९ श्री. सुरेश मुकुंद पागी, पालघर ५४. डॉ. पोपरे वाळिबा विठ्ठल, ठाणे

१० श्री. दीपक पांडुरंग साळुंखे, पालघर २५ श्री. भागोराव नारायण शिरडे, नांदेड ४० श्रीम. रंजना किशोर संखे, पालघर ५५ श्री. रत्नाकर तुकाराम घरत, रायगड

११ श्री. प्रकाश रामचंद्र वायदंडे, सातारा २६ श्री. भगवान आश्रु कोकाटे, बुलढाणा ४१ श्री. वसंत नवशा भसरा, पालघर ५६ श्री. संतोष शिवराम जनाठे, पालघर

१२ श्री. जयपाल परशुराम पाटील, रायगड २७ श्री. धोंडिराम किसन थैल, नाशिक ४२ श्री वसंत नारायण कनाके, यवतमाळ ५७ श्री. लक्ष्मण ढवळ टोपले, पालघर

१३ श्री. भास्कर लडकू दळवी, पालघर २८ श्री. गणपत सहादु मुकणे, नाशिक ४३ डॉ. मधुकर गणपत कोटनाके, चंद्रपूर ५८ डॉ. चरणजित सिंग बलविरसिंग सलुजा, गडचिरोली

१४ श्री. सुभाष केशवराव येणोरकर, अमरावती २९ श्री. बिसन सिताराम सयाम, भंडारा ४४ श्री. सीताराम हावशा भिवनकर, वर्धा ५९ श्री. बबन धुवालाल गोरामन, नागपूर

१५ श्री. रमेश मिरगुजी उईके, नागपूर ३० श्री. सखाराम ठका गांगड, अहमदनगर ४५ श्री. वसंत श्यामराव घरटे, धुळे ६० श्री. दिनेश अंबादास शेराम, नागपूर

आदिवासी सेवा संस्था पुरस्कारार्थी

२०२१–२०२२

२०२२–२०२३

१. कै. दिलवरसिंग पाडवी स्मारक स्मृती संस्था, नंदुरबार ५ कन्हैयालाल बहुउददेशिय संस्था, धुळे

२. दीनदयाल वनवासी विकास संस्था, नंदुरबार ६ शिक्षण प्रसारक मंडळ मोरचंडी, यवतमाळ

३ श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था, गडचिरोली ७ अहिल्या मंडळ, रायगड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *