कोळी महासंघाच्या चिंतन शिबिरात लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजप ला पाठिंबा देण्याचा ठराव राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या सह सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आला… ९ ऑगस्ट २०२४ आदिवासी दिवसा पर्यंत समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न राज्यसरकारने नाही सोडवल्यास… विधानसभेला पाठिंब्याचा पुनर्विचार केला जाईल प्रसंगी विरोधात जाऊ असे युवाअध्यक्ष ऍड. चेतन रमेशदादा पाटील यांनी सांगितले…
लोणावळा: दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही ( २०२४) कोळी महासंघाचे चिंतन शिबिर कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार श्री . रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या संपन्न झाले . या चिंतन शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो पदाधिकारी व कोळी बांधवांनी सहभाग घेतला तर या शिबिरामध्ये आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तसेच लोकसभा निवडणूक २०२४…


