दिनांक : 9-3-2024 रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे कोळी कोळी महासंघाच्या वतीने संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीस आमदार रमेश दादा पाटील हे उपस्थित होते.
या विशेष बैठकीचे संयोजन कोळी महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा ॲक्शन कमिटीचे सदस्य चंद्रकांत घोडके यांनी केलेले होते.
या बैठकीस महासंघाचे उपाध्यक्ष शिव शंकर फुले,सहसचिव मीडिया प्रमुख सतीश धडे, छ. संभाजी नगर महनगर प्रमुख माधव बुधवारे, सचिन गोदे ,कल्याण मोरे ,गणेश मोरे हिंगोली, संगीता ताई धोंडगे, गंगाधर शिंदे इत्यादी प्रमुख पदाधिकारी ही उपस्थित होते.
पदाधिकारी यांच्या या विशेष बैठकीस प्रबोधन करत असताना कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश दादा पाटील यांनी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याचा संपर्क दौरा मी आपल्याशी आपल्या समस्या आपली मत जाणून घेण्यासाठी खास आयोजित करून तुमच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेलो आहे असे सांगून 2014 पासून आतापर्यंत आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र साठी केलेल् सातत्यपूर्ण कार्याचा संपूर्ण लेखाजोखा देत संघटन मजबूत करण्यासाठी तुमच्या नवीन पदाधिकाऱ्याकडून मला विशेष अपेक्षा आहेत याची जाणीव करून दिली. जुन्या पदाधिकाऱ्यांचाही कोळी महासंघात
उचित सन्मान करत कुणालाही पदावरून दूर केले नसून जुन्या जिल्हाध्यक्षांची उपाध्यक्षांची युवा अध्यक्षांची पदोन्नती केलेली आहे. आणि या नवीन पदाधिकाऱ्यांना आपले सामाजिक कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे दोघांनीही एकमेकांशी सहकाऱ्यांनी संघटनेस बळकटी द्यावी व आपला कोळी महासंघ मजबूत करावा अशी मी आपल्याकडे अपेक्षा करतो असे सांगितले .
बैठकीत जालना जिल्ह्यातील किरण कोळी रामू मोते काशिनाथ दांडगे या जुन्या पदाधिकाऱ्यांसह अनेक नवीन पदाधिकारी ही उपस्थित होते.
नवीन पदाधिकाऱ्यांना कोळी महासंघाचे अध्यक्ष आदरणीय रमेश दादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामू मोते यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण कोळी यांनी केले.
संपर्क दौऱ्यात भोकरदन येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात आमदार संतोष दानवे यांच्याशी चर्चा… संतोष दानवे यांचे सर्व समस्या सोडवायची हमी दादांनी घेतली अम्हीं खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत आहोत… असे आश्वासन दिले…
परतीच्या प्रवासात सिल्लोड येथे माननीय अब्दुल सत्तार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयात ही भेट घेऊन चर्चा. त्यांनाही येत्या मे जून पर्यंत आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न मार्गी लावू आसे शासन दिले.
त्यांच्या कार्यालयात आमदार रमेशदादा पाटील यांचा सत्कार मंत्री महोदयांनी केला त्या वेळी विठ्ठल सपकाळ हे ज्येष्ठ पदाधिकारी तेथे उपस्थित होते.



