Headlines

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे सन २०१९-२० ते २०२२-२०२३ मधील विविध पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले…

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे सन २०१९-२० ते २०२२-२०२३ मधील विविध पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एनसीपीए, मुंबई येथे प्रातिनिधीक स्वरुपात प्रदान करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात वैयक्तिक व संस्था पातळीवर एकूण ३९३ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यापैकी प्रातिनिधीक स्वरूपात १४ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आले.

पायाभूत सोयी सुविधा उभारणी, परकीय गुंतवणुकीत राज्य देशात अव्वल असून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही अग्रेसर आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढत देशात व राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आधारित कारभार सुरू असल्याचे सांगितले.

मागील चार वर्षांचे प्रलंबित असलेले ३९३ पुरस्कार आपण देत आहोत. पुरस्कार नवीन काम करण्याची ऊर्जा देतात. पुरस्कार प्राप्त व्यक्तीच्या कामाची प्रेरणा अन्य घेऊन चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे समाजाच्या जडणघडणीत अनुकूल परिणाम दिसून येतो.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सामाजिक न्याय विभागामार्फत समाजातील मागास, वंचित घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक विकासाकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू असते. त्यामुळे या विभागाला पर्याप्त निधी देण्याचा नेहमी प्रयत्न असतो.- उपमुख्यमंत्री अजित पवार…

पुरस्कारांचे मानकरी

सोहळ्यात वैयक्तिक व संस्था पातळीवर एकूण 393 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यापैकी काही पुरस्कारार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. पवार व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार : (वैयक्त‍िक स्तरावर) बापूसाहेब कांबळे, जि. कोल्हापूर, शिवाजी गवई जि. जालना, कृष्णाजी नागपुरे जि. चंद्रपूर, राजू झनके, जिल्हा मुंबई उपनगर, नागसेन कांबळे, जिल्हा मुंबई शहर, (संस्था स्तरावर) श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण जि. सातारा, पब्लिक वेलफेअर सोसायटी जि. नागपूर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार :  (वैयक्त‍िक स्तरावर) पोपटराव साठे, जि. अहमदनगर, रावसाहेब कदम जि. ठाणे, (संस्था स्तरावर) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण विकास मंडळ छत्रपती संभाजीनगर, कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार : (वैयक्त‍िक स्तरावर)  धोंडिरामसिंह राजपूत छत्रपती संभाजीनगर, (संस्था स्तरावर)  क्रांतिसूर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, हाडगा, ता. निलंगा, जि. लातूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार :  संस्था स्तरावर कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सर्वोदय वसतिगृह कासेगाव ता. वाळवा जि. सांगली, शाहू फुले आंबेडकर पारितोषिक : संस्था स्तरावर सतचिकित्सा प्रसारक मंडळ, यवतमाळ, संत रविदास पुरस्कार : वैयक्त‍िक स्तरावर श्वेता दाभोळकर ठाणे, संस्था स्तरावर शिवकृपा समाज सेवा मंडळ, लातूर यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे आभार आयुक्त श्री. बकोरीया यांनी मानले.

हाडगा तालुका निलंगा येथील क्रांतीसुर्य बहुउद्देशीय संस्थेस ही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव सौ ज्योती सुर्यवंशी आणि श्री गोविंद सुर्यवंशी यांचे कोळी समाज संदेश परिवार च्या वतीने अभिनंदन…सतीश धडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *