भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कोळी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यां समवेत बैठक संपन्न झाली. लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. निमंत्रित प्रमुख पदाधिकारी यांच्या या बैठकीत विविध सामाजिक व राजकीय विषयावर चर्चा झाली 2019 पासून विनाशर्त पाठिंबा देवून ही जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र याचा प्रश्न सुटलेला नाही. तरीही त्यामुळे समाजात नाराजी पसरली असल्याचे सर्व पदाधिकारी यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या समोर सांगून यावर वेळीच निर्णय झाला असता तर आम्ही खुशीने प्रचारात सहभागी झालो असतो पण लोक प्रश्न विचारतात ते तुमच्या समक्ष मंडोटो आहोत. राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या सूचनेुसार कार्यकर्ते काम करतील पण जनमानसात ही ठोस काही होईल याची शस्वती आपण द्यावी असे सांगितले.
त्यावर त्यांनी विलंब झाला असल्याचं मान्य केले आणि याबाबत सकारात्मक प्रयत्न चालू आहेत. निवडणुकीनंतर नक्की आपल्याला न्याय देण्यात माझी भूमिका अग्रस्थानी असेल अशी ग्वाही देऊन आदिवासी – कोळी समाजासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती प्रभावीपणे आदिवासी – कोळी बांधवांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून यावेळी आपण प्रयत्न करून महायुतीचे उमेदवार विजयी करण्यात योगदान द्यावे अश्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.
बैठकीस भाजप प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक , कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार श्री . रमेशदादा पाटील, श्री . प्रकाश बोबडी , श्री . राजहंस टपके, श्री चेतन पाटील, श्री . शिवशंकर फुले, श्री . सतीश धडे, श्री.पहाडसिंग सुरडकर श्री . हरीलाल कोळी, श्री . प्रभाकर सोनवणे, श्री . देवानंद भोईर, श्री बाळासाहेब सौंदणे, श्री . मुकेश सोनवणे, श्री .चंद्रकांत घोडके, श्री . सुभाष कोळी, श्री.मारोती सुरडकर यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


