Headlines

कोल्हापूरच्या महासैनिक दरबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस पुन्हा त्याच उत्साहात … मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार भाषण

कोल्हापूरच्या महासैनिक दरबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस पुन्हा त्याच उत्साहात आणि आनंदात पार पडला. महाअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या मान्यवरांची विशेष सत्रे आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, मंत्री दीपक केसरकर, भरतशेठ गोगावले, सुहास कांदे यांची विशेष सत्रे पार पडली. तर शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या…

Read More

कोळी महासंघाचे अध्यक्ष विधान परिषद सदस्य आमदार रमेशदादा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून हर्णे पाज पंढरी येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपा आमदार श्री . रमेशदादा पाटील यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून दापोली तालुक्यातील हर्णे व पाजपंढरी येथील रस्ताळे मंडळ येथे कोळी समाज बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण व रस्ता काँक्रिटीकरणाचा लोकार्पण सोहळा … कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष व भाजपा मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड चेतनदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला ….

Read More

कोळी महासंघाच्या वतीने लोहगड – घेरेवाडी येथे भाजपा मच्छीमार सेल चे अध्यक्ष तथा कोळी महासंघाचे युवा नेते ऍड. चेतन रमेशदादा पाटील यांच्या उपस्थित साजरी…

भाजपा मच्छीमार सेल व कोळी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळा कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा अध्यक्ष भाजपा मच्छिमार सेल महाराष्ट्र राज्य ऍड . चेतन रमेशदादा पाटील यांच्या उपस्थित आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लोहगड- घेरेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोहगड…

Read More

कोल्हापूर प्रेस क्लबच्या वार्षिक पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही… कोल्हापूर : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. कोणत्याही प्रश्नाला, समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात. पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात…

Read More

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द; विक्रमी वेळेत, अहोरात्र काम करून सर्वेक्षण पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री यांच्याकडून टीम चे कौतुक

मुंबई दि. १६: राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वर्षा निवासस्थानी आज सकाळी हा अहवाल सुपूर्द करतेवेळी आयोगाचे सदस्यदेखील उपस्थित होते. यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा साडेतीन ते चार…

Read More

आदिवासी संघर्ष समितीचे वतीने आयोजित बैठकीत आमदार रमेशदादा पाटील यांचे आदिवासी कोळी बांधव यांच्या समस्या प्रामुख्याने मांडून सोडविण्याचे आश्वासन

नाशिक: आमदार रमेशदादा पाटील यांच्या कोळी महासंघाच्या संघटनात्मक बांधणी  दौऱ्यादरम्यान आदिवासी संघर्ष समिती अध्यक्ष श्री . विशाल मळेकर यांच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आयोजित चर्चासत्रात सहभागी होऊन जमलेल्या सर्व आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्यावरती मार्गदर्शन केले . p यावेळी कोळी महासंघाचे उपनेते श्री .देवानंद भोईरजी, नाशिक महानगरपालिकेतील नगरसेवक श्री .योगेश शेवरे, आदिवासी…

Read More

कोळी महासंघाची नाशिक जिल्हा – नूतन कार्यकारणी नियुक्ती समारोह आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न.

कोळी महासंघाची नाशिक जिल्हा – नूतन कार्यकारणी नियुक्ती समारोह कोळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे संपन्न झाला . नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, देवळा, बागलाण … या ९ तालुक्यातील कोळी महासंघ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आणि त्यांना नियुक्ती पत्र देऊन महासंघाच्या पुढील वाटचालीस…

Read More

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची कोळी महासंघाची संघटनात्मक बैठक आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न . 

नाशिक – निफाड जिल्हा नाशिक येथे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत श्री .पंढरीनाथ पिठे यांच्या संयोजनात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची कोळी महासंघाची संघटनात्मक बैठक संपन्न झाली . या बैठकीत महासंघाची संघटनात्मक बांधणी , महासंघाची ताकद वाढवणे , पुढील रणनीती , समाजाचे प्रलंबित असणारे प्रश्न अश्या विविध विषयांवर चर्चा व संवाद झाला ….

Read More

कोळी महासंघ लातूर जिल्हा बैठकीत राजू रायणुळे यांची रेणापूर तालुका अध्यक्ष पदी निवड

दिनांक २८/१/२०२४ रोजी कोळी महासंघाची बैठक  श्रीकृष्ण पिटले जिल्हा अध्यक्ष कोळी महासंघ लातूर जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठलरावजी इरले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विठ्ठलराव इरले यांच्या हस्ते लातूर  जिल्हा व तीन तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सुरेश गरगटे जिल्हा उपाध्यक्ष लातूर श्री विजय जमादारसर जिल्हा सचिव श्री…

Read More

शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन…

मुंबई दि. : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाजमाध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी,…

Read More