Headlines

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची कोळी महासंघाची संघटनात्मक बैठक आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न . 

नाशिक – निफाड जिल्हा नाशिक येथे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत श्री .पंढरीनाथ पिठे यांच्या संयोजनात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची कोळी महासंघाची संघटनात्मक बैठक संपन्न झाली .

या बैठकीत महासंघाची संघटनात्मक बांधणी , महासंघाची ताकद वाढवणे , पुढील रणनीती , समाजाचे प्रलंबित असणारे प्रश्न अश्या विविध विषयांवर चर्चा व संवाद झाला . या बैठकीच्या अनुषंगाने आपल्या अध्यक्षतेखाली कोळी महासंघ पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली

यावेळी देवळाली मतदारसंघ – नाशिक शहरअध्यक्ष पदी सौ .सोनाली दुर्गादास चारस्कर यांची नाशिक जिल्हाअध्यक्ष पूर्व या पदावर श्री . केदु लक्ष्मण भोई यांची तर निफाड तालुका अध्यक्ष पदावर श्री . प्रभाकर एकनाथ पवार यांची निवड करून त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र आपल्या हस्ते प्रदान करण्यात आले . यावेळी कोळी महासंघाचे उपनेते श्री.देवानंद भोईर, श्री.पंढरीनाथ पिठे, श्री. गुलाबराव गांगुर्डे, श्री .स्वप्निल गायकवाड, श्री .सोनवणे सर, श्री .नेहरे सर, श्री .दुर्गादास चारस्कर, श्री .शिवाजी चौधरी, श्री .शंकर पवार, श्री .माधव गायकवाड, श्री .प्रभाकर पवार, सौ .अंजलीताई अभंगराव, सौ .वैशालीताई पवार, सौ . सपनाताई पवार व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *