कोळी महासंघाची नाशिक जिल्हा – नूतन कार्यकारणी नियुक्ती समारोह कोळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे संपन्न झाला . नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, देवळा, बागलाण … या ९ तालुक्यातील कोळी महासंघ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आणि त्यांना नियुक्ती पत्र देऊन महासंघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या . 
यावेळी कोळी समाजातील सौ .कमलाताई गांगुर्डे ( नगराध्यक्ष दिंडोरी ) ,सौ .सुशीलाताई पवार ( सरपंच शिंगवे ) श्री . ज्ञानेश्वर पोटिंदे (सरपंच , महादेवपुर) , श्री .अशोक जाधव (सरपंच निमगाव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ) , सौ मंगलाताई उघडे (सरपंच ,ओझे ) , श्री . प्रकाश गायकवाड ( नळवाडी सरपंच ) ,श्री .गणेश बच्छाव ( ग्रामपंचायत सदस्य महालपाटणे ) , श्री .संदीप गांगुर्डे – ( ग्रामपंचायत सदस्य सावळी देऊळ ) या सर्व समाज बांधवांचा आमदार श्री . रमेशदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी कोळी महासंघाचे उपनेते श्री . देवानंद भोईरजी , श्री . गुलाबराव गांगुर्डेजी , श्री .गणेश राजकोरजी , श्री .बाळासाहेब जाधवजी , श्री. युवराज सैंदाणेजी , श्री. नितीन शेवरे , नाशिक जिल्ह्यतील ९ तालुक्यातून आलेले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



