Headlines

कोळी महासंघाचे अध्यक्ष विधान परिषद सदस्य आमदार रमेशदादा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून हर्णे पाज पंढरी येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपा आमदार श्री . रमेशदादा पाटील यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून दापोली तालुक्यातील हर्णे व पाजपंढरी येथील रस्ताळे मंडळ येथे कोळी समाज बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण व रस्ता काँक्रिटीकरणाचा लोकार्पण सोहळा … कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष व भाजपा मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड चेतनदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला . यावेळी सर्व समाज बांधवांना ॲड चेतनदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले . या कामांमुळे समाज बांधवांना व ग्रामस्थांना फार मोठा दिलासा हा मिळणार आहे .

यावेळी श्री .पी एन. चौगुले (चेअरमन हर्णे पाज पंढरी मच्छीमार सोसायटी ) ,श्री .किसन चौगुले ( माजी चेअरमन -हर्णे पाज पंढरी मच्छीमार सोसायटी ) , श्री . मानकर सर (जिल्हाध्यक्ष ,कोळी महासंघ ) , श्री . सी . आर . कांबळे , श्री गजानन चौलकर (माजी जिल्हाध्यक्ष – कोळी महासंघ ) ,श्री . पांडुरंग पावसे (जिल्हाध्यक्ष ,कोळी महासंघ ) श्री . पि . के. चौगुले (कोळी महासंघ , संपर्कप्रमुख ), श्री . विष्णू पावसे (मच्छीमार सेल , जिल्हाध्यक्ष ) श्री वामन चौगुले , श्री काशिनाथ पावशे , श्री अंकुश चौलकर, श्री रघुनाथ चौगुले , हर्णे पाज पंढरी येथील समस्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

धैर्य आणि शौर्य दाखवत बुडणाऱ्या नौकेतील लोकांचे जीव वाचवणाऱ्या नरेश चौगुले यांचा सत्कार…

पाजपंढरी गावची नौका 24 डिसेंबर रोजी मासेमारी साठी गेली असता ती रात्री दोनच्या सुमारास बुडत होती . यावेळी श्री .नरेश चौगुले व श्री .परत चौगुले यांनी जीवाची परवा न करता रात्री दोनच्या सुमारास समुद्रात पोहत बोटीवरील चार ते पाच समाज बांधवांना वाचवल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला .

श्री .नरेश चौगुले यांच्या या धाडसाबददल सर्वत्र कौतुक होत आहे तरी श्री .नरेश चौगुले यांना पुरस्कारासाठी पुरस्कृत करण्यात यावे, अशी विनंती श्रीराम मच्छिमार सहकारी सोसायटी लिमिटेडच्यावतीने करण्यात आली . ज्याबाबत नक्कीच पत्रव्यवहार केला जाईल असे याप्रसंगी आश्वासित केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *