Headlines

कोळी महासंघाच्या वतीने लोहगड – घेरेवाडी येथे भाजपा मच्छीमार सेल चे अध्यक्ष तथा कोळी महासंघाचे युवा नेते ऍड. चेतन रमेशदादा पाटील यांच्या उपस्थित साजरी…

भाजपा मच्छीमार सेल व कोळी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळा कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा अध्यक्ष भाजपा मच्छिमार सेल महाराष्ट्र राज्य ऍड . चेतन रमेशदादा पाटील यांच्या उपस्थित आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लोहगड- घेरेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

लोहगड घेरेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून गावातील  हनुमान मंदीरात छोटीशी प्रबोधन पर सभा झाली. यावेळी ग्रामस्थांनी व्यवसाय आणि गडाच्या पायथ्याशी आम्ही जो टप्री वजा दुकाने चालवून उदरनिर्वाह चालतो तो वन विभागाकडून मज्जाव केल्याने आणि मनाई केल्यानं बंद पडतो त्यासाठी शासनाकडून काहीतरी केस्वरुपी परवानगी देण्यात आले तर सहकारी होईल.. तसेच राशन दुकान याबाबत ही समस्या मांडली.. त्यावर ऍड चेतंन पाटील यांनी शासन प्रशासन यांच्याकडे समस्या मांडून सोडविण्याचे आश्वासन दिले.

प्रास्ताविक सौ. माधुरी सोनवणे यांनी तर कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे आभार नंदा ताई बैकर यांनी व्यक्त केले..

यावेळी श्री सतीश धडे कोळी महासंघ सोशल मीडिया प्रमुख महाराष्ट्र राज्य , श्री नितीन नागपुरे , श्री दीपक चव्हाण , श्री लक्ष्मण शिंगोरे , श्री ओमकार पवार , सौ माधुरी ताई सोनवणे, गणेश धानिवले ( जिल्हा पंचायत सदस्य ), सौ सोनाली ताई बैकर (सरपंच लोहगड ), सौ ज्योतीताई धानिवले (उपसरपंच), सौ नेहा बैकर ग्रामपंचायत सदस्य, काजल ढाकोल ग्रामपंचायत सदस्य, समस्त ग्रामस्थ लोहगड घेरेवाडी इत्यादी शिवप्रेमी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *