कोळी समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आदिवासी विकास मंत्री व अधिकार्यांच्या सोबत समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक लावून आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न सोडवावा यासाठी प्रयत्न करणार – ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन
जळगाव: (प्रतिनिधी) आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी यांना सविंधानाने दिलेले अधिकार मिळविण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेल्या चार दिवसापासून चालू असलेले विविध आदिवासी कोळी समाज संघटनांच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या स्थळी , महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांनी…


