Headlines

विधान भवन, मुंबई येथे मा. नीलम गोऱ्हे , उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांच्या उपस्थितीत आज १३ ऑक्टोबर २०२३रोजी आदिवासी कोळी समाजाची बैठक… जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र बाबत समस्यांवर बैठकीत चर्चा करणार शिष्टमंडळ…!

विधानपरिषद सदस्य व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार श्री .रमेशदादा पाटील यांनी मागील अधिवेशना दरम्यान केलेल्या मागणीच्या अनुषंगाने आज १३ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वा विधान भवन, मुंबई येथे मा. नीलम गोऱ्हे , उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी बैठक आयोजित केली आहे.

प्रामुख्याने या बैठकीत खालील विषयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

#राज्यातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी व इतर तत्सम जमातींच्या बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत

#अनुसूचित जमातीतील आदिवासी कोळी जमाती ना रक्त संबंधातील तसेच इतर जवळच्या कोणत्याही नातेवाईका चे वैधता प्रमाणपत्र सादर केल्यानंतर बार्टी च्या जात पडताळणी समितीच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत चे निर्देश सरकारने पडताळणी समितीला द्यावेत यासाठी प्रामुख्याने संबधित विभागाच्या मंत्री तसेच अधिकाऱ्यांना मुद्देसूद पुराव्यासह निवेदन देवून चर्चा करण्यात येणार आहे ..

या बैठकीस आदिवासी कोळी समाजातील तज्ञ व्यक्ती तसेच कोळी महासंघाचे कोळी महादेव टोकरे कोळी मल्हार कोळी डोंगर कोळी जमातीचे प्रमुख पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत…

##################################

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *