Headlines

आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी यांना सविंधानाने दिलेले अधिकार मिळविण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरू – आज मंत्री गिरीष महाजन आणि आमदार रमेशदादा पाटील आंदोलन स्थळी भेट देणार

जळगाव -(प्रतिनिधी) महाराष्ट्रातील विस्तारित क्षेत्रातील आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी यांना सविंधानाने दिलेले अधिकार मिळविण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरू आहे. या उपोषणास तमाम महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीच्या संघटना पाठिंबा देत आहेत.

उपोषणास खालील सहा सामाजिक कार्यकर्ते बसले आहेत.

1) श्री जगन्नाथ बाविस्कर

2 ) श्री संजय कांडेलकर

3 ) श्री नितीन कांडेलकर

4 ) श्री पद्माकर सपकाळे

5 ) श्री नितीन सपकाळे

6 ) श्री पुंडलिक सोनवणे

वरील सहाही समाज बांधव आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण करीत असुन आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुर्ण महाराष्ट्रातुन उपोषण स्थळी भेट द्यावी.

या सहापैकी काल दोघांची तब्येत बिघडली होती त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हे उपोषण कुठल्याही एका संघटनेचे किंवा एखाद्या पक्षाच्या  वतीने केल्या जात नसुन सकल आदिवासी कोळी  समाज म्हणून व सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांच्या वतीने हे उपोषण चे संवैधनिक हत्यार उपसले असुन वंचित आदिवासी कोळी बांधवानी ही उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण कर्त्यांचे मनोबल वाढवुन समाज हित लक्षात ठेवुन प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून न्याय हक्काच्या लढाई योगदान द्यावे.आता आपला प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुढे दोन ते तीन महिन्या मध्ये 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येत आहे. त्याचा राजकीय फायदा घेणे साठी कोणत्याही परिस्थित शासनावर दबाव टाकुन कायदेशीर मार्गाने आपला प्रश्न सुटणार ही अपेक्षा आहे.परंतु त्यासाठी सर्वांनी तन, मन धनाने तसेच आपले वैचारिक मतभेद ला बाजूला ठेवून एक कोळी लाख कोळी हा फॉर्म्युला घेऊन यश प्राप्त करण्यासाठी सर्व संघटना चे पदाधिकारी तसेच पक्ष चे पदाधिकारी,मंडळे, संस्था, समित्या, परिषद, यांनी आप आपल्या परीने जसा आपल्याला वेळ मिळेल तसा समाज बांधवांनी येणारे पिढीसाठी व आपले अस्तित्व टिकविण्यासाठी उपोषण स्थळी हजोरोच्या संख्येने  हजर होण्याचे आवाहन अन्नत्याग आंदोलक संयोजन समितीने केले आहे. त्यास प्रतिसाद देऊन हजारो आदिवासी कोळी समाज बांधव भगिनी सहभागी होत एकत्र येत आहे.

आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री दशरथ भांडे यांनी ही या आंदोलन स्थळी भेट देवून आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याशी ही शिष्टमंडळ घेवून लवकरात लवकर यावर उपाय योजण्यात येवुन न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे यांनी ही उपोषणकरत्याचे मनोधैर्य वाढवण्यासाठी धुळे येथून येवुन आंदोलनात सहभागी होऊन न्याय मागण्यासाठी होत असलेल्या या आंदोलनास सक्रिय पाठिंबा दिला आहे .

आज कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील आणि मंत्री गिरीष महाजन हे उपोषण कर्त्याची भेट घेवून याबाबत चर्चा करणार आहेत. आणि याबाबत काय तोडगा निघेल याची उत्सुकता तमाम महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीच्या लोकांना आहे.

@@@@@@@@@@

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *