मुंबई : येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तसेच इतर शासकीय योजनांचे लाभ …यासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांची ठोसपणे अंमलबजावणी होत नसल्याचा विषय पुन्हा एकदा विधानपरिषद सभागृहात मांडला.
महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, मन्नेरवारू या जमातीच्या बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने समाज बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. दाखले मिळत नसल्यामुळे शासकीय योजनांपासून हा समाज बांधव वंचित राहत आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुुलभरित्या मिळण्याकरिता वारंवार अनुसूचित जमातीतील बांधवांकडून मागणी होत आहे.
याकडे लक्ष वेधत सभागृहात आवाज उठविला.
ज्यावर मा .विधानपरिषद सभापती महोदय यांच्या माध्यमातून राज्य सरकारला लवकरात लवकर ह्या विषयासंदर्भात तोडगा कायद्याच्या आधारावर काढण्याच्या सूचना करण्यात आल्या .


