सोलापूर : सोलर जिल्ह्यात आज कोळी समाजाचे अभ्यासक अखिल भारतीय कोळी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे कायदे व विधितज्ञ प्रा. शरण खानापुरे सरांच्या कायदेशीर मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांचे उपस्थिती मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये यशस्वी बैठक संपन्न झाली.
या बैठकीत डेक्कन ( दख्खन) आणि बालाघाट पर्वत
रांगामध्ये राहणारे कोळी हे अनुसूचित जमातीतील कोळी बांधव असल्याचे ब्रिटिश कालीन आणि निजामशाही पुरावेसह पटवून सांगितले त्यांना जातीचा दाखला कोळी नोंदीवरून देण्यात यावे अशी प्रमुख मागणी केली त्यावरून
जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेबांनी आपल्याकडील सर्व पुरावे आणि कोर्टाचे निर्णय घेऊन यावे आषाढी वारी झाल्यावर परत एकदा सर्व प्रांतअधिकारी आणि जात वैधता पडताळणी समितीचे अधिकारी ह्यांच्या सोबत लवकरच महिन्याभरात बैठक घेऊन आपल्याला कोळी नोंदीवरून अनुसूचित जमातीचे दाखले देण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू असे शब्द दिले आहेत
ह्या बैठकिस प्रमुख उपस्थिती पंढरपूर तालुक्याचे जेष्ठ नेते बाबा अधटराव, अखिल भारतीय कोळी समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ भाऊ कोळी, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता भाऊ सुरवसे, कोळी समाजाचे नेते अरुण भाऊ कोळी,वाल्मिकी संघाचे नेते गणेश अंकुशराव, जिल्ह्याचे अभ्यासक बाळासाहेब कोळी सर, अरुण लोणारी,दादा करकमकर, रेनुकाचाऱ्य खानापुरे, सिद्धनाथ कोरे(पैलवान), सोमनाथ अभंगराव , काकासाहेब वाघमारे, एम. टी.कोळी, मंगरुळे साहेब, अप्पासाहेब हिप्परगे , सुरेश कोळी, संजय माने आणि इतर कोळी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.



