टिकाऊ, दर्जेदार कामे करा-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यातील विविध विकास कामांची पाहणी
पुणे, दि.५: प्रशासकीय इमारतीची कामे आगामी १०० वर्ष टिकणारी, दर्जेदार करा, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी प्रसंगी दिले. यावेळी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक नंदकुमार काटकर, नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण,…


