वलांडी -जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक 28 व 29 डिसेंबर 2023 रोजी रेनीसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यात माध्यमिक गटातून जढाळे सानिका संतोष, जढाळे सपना बालाजी व जढाळे सायली संतोष यांचा हायड्रोजन सोलार पॅनल हा प्रयोग जिल्हया तून द्वितीय येऊन आता या प्रयोगाची राज्य स्तरावर निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांना धडे आर.एस.यांनी मार्गदर्शन केले. आणि या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन शाळेचे मुख्याध्यापक रामलिंग मुळे व सर्व स्टाफ यांच्या तर्फे सत्कार करण्यात आले. या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे गुरुजी, अध्यक्ष अनिल मुळे, सचिव डॉ. प्रा. सौ. सुनिताताई चवळे, कोषाध्यक्ष डॉ.भालचंद्र पैके, मुख्याध्यापक रामलिंग मुळे, पर्यवेक्षक बंडगर सी.एस,तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अभिनंदन व कौतुक केले.
जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री महादेव विद्यालयाच्या हायड्रोजन सोलर पॅनल प्रयोगाची राज्यस्तरावर निवड..


