शासकीय व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरजमध्ये होणार उपचार
सांगली : सांगली जिल्हा अमली पदार्थ मुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे ठरणारे अद्ययावत यंत्रसामुग्रीने युक्त अशा व्यसनमुक्ती केंद्र व पुनर्वसन केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले. या केंद्रातून व्यसनाधीन लोकांवर अद्ययावत उपचार मोफत केले जाणार आहेत. याचा लाभ घेऊन जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्याच्या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…


