आदरणीय माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर (अक्कांची) इच्छा व मा. संभाजीभैय्यांचा मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आपली अक्का फाऊंडेशन सातत्याने कार्यरत आहे. आपलेपणाची भावना जपत गेल्या ९ वर्षांच्या संस्थेच्या प्रदीर्घ कार्याला आज जागतिक मान्यता मिळाली असून ‘दैनिक लोकमत माध्यम समूहा’कडून लंडन येथे आयोजित ‘Global Economic Convention’ मध्ये आज संस्थेसाठी मला ‘लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचा जागतिक व्यासपीठावर झालेला सन्मान हा आपल्या सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाचे यश आहे.
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्या पत्नी सौ. अमृताताई फडणवीस, लोकमतचे श्री. राजेंद्रजी दर्डा, विजयजी दर्डा, श्री. सुनीलजी शेट्टी या सर्वांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारताना मनाला अत्यंत आनंद तसेच कृतज्ञ वाटले.
गेली ९ वर्षापासून वर्षांपासून अक्का फाऊंडेशन सातत्याने समाजाच्या उन्नतीसाठी झटत आहे. ज्यामध्ये आमच्या भगिनी सौ. प्राजक्ताताई मारवाह यांची खूप मोलाची भूमिका राहिली आहे. कोरोना विरोधातील भीषण लढा, त्यावेळी संस्थेने दिलेली माणुसकीची साथ, लातूरच्या जलसंधारण क्षेत्रात संस्थेने दिलेले भरीव योगदान, आरोग्य क्षेत्रात सर्व सामान्य गरीब जनतेला दिलेला हक्काचा आधार व विश्वास, छत्रपती शिवराय व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विश्वविख्यात जयंती साजरीकरण आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रोजेक्ट आनंदी सारखे विविध जनोपयोगी उपक्रम या सर्वांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना आज पुरस्काराने दिली आहे.
आपल्या सर्वांचे प्रेम, सहकार्य आणि सोबतीमुळे आज हा बहुमान मिळालेला आहे. हा प्रत्येक पुरस्कार नसून वाढलेल्या जबाबदारीची जाणीव आहे. आनंदाच्या क्षणी आपल्या सर्वांच्या सोबतीने आणखीन पुढे जाऊ समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कायम प्रयत्न करत राहूया!
संस्थेला सहकार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवक, सहकारी व हितचिंतकांचे मन:पूर्वक आभार तसेच अभिनंदन!


